घरातून बाहेर पडले नाहीत त्यांनी धारावीच्या यशाचे श्रेय घेऊ नये, चंद्रकांत पाटील यांनी खडसावले


धारावी झोपडपट्टीने चीनी व्हायरसला रोखले. येथील रहिवाशांनी करून दाखवलं. परंतु, त्याचे श्रेय घेण्यासाठी आता राज्यकर्ते उतरले आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच खडसावले आहे. या संकटकाळात घरातून बाहेरसुद्धा निघाले नाहीत अशा कोणत्याही नेत्याला हे श्रेय घेता येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई :  धारावी झोपडपट्टीने चीनी व्हायरसला रोखले. येथील रहिवाशांनी करून दाखवलं. परंतु, त्याचे श्रेय घेण्यासाठी आता राज्यकर्ते उतरले आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच खडसावले आहे. या  काळात घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही अशा कोणत्याही नेत्याला हे श्रेय घेता येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

अशिया खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील चीनी व्हायरसचा उद्रेक नियंत्रित करण्यात यश मिळाले आहे. यामागे अनेकांचे प्रयत्न आहेत. मुळात येथील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांच्या सेवाभावाने त्यांना बळ दिले. संघाने शेकडो स्वयंसेवक धारावी परिसरात उतरविले. या कार्यकर्त्यांकडून येथील नागरिकांना अन्न-धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्याबरोबर नागरिकांच्या थर्मल स्क्रिनींगची जबाबदारीही घेण्यात आली होती.

मात्र, महाविकास आघाडीचे अनेक नेते त्यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. पाटील यांनी ट्विट करून या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. पाटील म्हणतात, चीनी व्हायरसविरुध्दच्या  या लढ्यात देशाच्या विविध भागांतून करोना योद्धे लढत आहेत. डॉक्टर, पोलीस, सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था या लढाईत सामील झाल्या आहेत.

मुंबई, पुण्यातील दाट लोकवस्तीच्या भागात गेल्या तीन महिन्यांपासून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अत्यंत धाडसाने नागरिकांचे स्क्रीनिंग, टेस्टिंग, आयसोलेशन यात हातभार लावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक सामाजिक संघटना आणि रुग्णालयांनी जागरूकता निर्माण करण्याचे काम केले.

लोकांच्या मनातून भीती दूर व्हावी व प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, हा एकच उद्देश डोळ्यापुढे ठेवून हे काम सुरू होते. आता जागतिक आरोग्य संघटनेने धारावीच्या यशस्वी लढ्याची माहिती जगभर सांगितली तेव्हा खरंतर सरकार या यशाचं श्रेय प्रत्येक लहानमोठा कार्यकर्ता व स्वयंसेवकांना देईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही.

भयाण महामारीत जे धारावीचं यश मिळालं आहे त्याचं श्रेय केवळ तिथे झटणाऱ्या करोना योद्ध्यांनाच जाते. चीनी व्हायरसच्या या  काळात घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही अशा कोणत्याही नेत्याला हे श्रेय घेता येणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. धारावीची जनता हुशार आहे. कधी, कोणी, कोणाची कशाप्रकारे मदत केली आहे, हे त्यांना निश्चितच माहिती आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था