खडसेंविषयी पक्षश्रेष्ठींकडे बित्तंबातमी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेवून आरोप केल्यानंतर फडणवीसांनी देखील यावर उत्तर दिलं आहे. “मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही. माझ्यात पेशंस आहेत. मनीष भंगाळे प्रकरणी खडसेंना राजीनामा द्यावा लागला नासून १२ तासांत खडसेंना क्लीन चीट मिळाली. खडसेंना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.” खडसेंबद्दल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य फडणवीसांनी केले.
सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, त्याचबरोबर अभिनेत्री कंगना राणौतविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.