उध्दव ठाकरेंनी घरी बसून पावसाचा आढावा घेतला ! महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आठवली देवेंद्र फडणवीसांची आपत्कालिन विभागाची भेट


मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झोडपून काढत आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘घरी बसून राहा’, हा आपला ‘पेटंट’ उपाय नागरिकांना सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचार्यांना गेल्यावर्षी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालिन विभागाला दिलेल्या भेटीची आठवण आली.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून पाऊस झोडपून काढत आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘घरी बसून राहा’, हा आपला ‘पेटंट’ उपाय नागरिकांना सांगितला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचार्यांना गेल्या वर्षी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालिन विभागाला दिलेल्या भेटीची आठवण आली.

गेल्या वर्षी २ जुलै रोजी मुंबईत मोठा पाऊस झाला. अनेक ठिकाणी मदतीची गरज होती. त्यावेळी फडणवीस यांनी थेट महापालिकेचा आपत्कालिन विभाग गाठला. महापालिकेने उभ्या केलेल्या यंत्रणेद्वारे कोणत्या भागात पाणी साचले आहे याची माहिती घेतली. तातडीने त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याची व्यवस्था केली. महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांना सूचना केल्या.

आजही मुंबईवर गेल्या वर्षीसारखेच संकट आले होते. मात्र, घराच्या बाहेर पडायचे नाही ही परंपरा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कायम ठेवली. त्यांनी अधिकार्यांशी चर्चा करण्याऐवजी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, हे आपले नेहमीचे आवाहन त्यांनी केले. संकटाशी अगोदरपासूनच झुंजत असलेल्या मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांना समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे सांगितले.

त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचआदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे. उध्दव ठाकरे यांचे भाषण अधिकार्यांनी ऐकले, परंतु त्यांच्या मनात गेल्या वर्षीची घटना आली. देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरले होते. स्वत: फिरून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती