उत्तर प्रदेशात उभी राहतेय देशातली पहिली ‘टॉय सिटी’


  • योगी आदित्यनाथ सरकारची विशेष योजना
  • ३ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक, हजारो रोजगार

विशेष प्रतिनिधी

 नवी दिल्ली : भारतात खेळणी क्षेत्रात तब्बल १० हजार कोटी रूपयांची उलाढाल होते. त्यात ८० टक्के वाटा सध्या चिनी खेळण्यांचा आहे. मात्र, आता खेळणी उद्योगात आत्मनिर्भर होण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशातली पहिली ‘टॉय सिटी’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुमारे ९२ भारतीय उद्योजकृ कारखाने उभारणार असून तब्बल ३ हजार कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतची घोषणा करून सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योजकांना आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण पुढे ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर मन की बात’ कार्यक्रमात देशातील खेळणी उद्योगास प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी नुकतीच व्यक्त केली होती. पंतप्रधानांच्या त्या आवाहनास उत्तर प्रदेशने सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

उत्तर प्रदेशात पारंपरिकरित्या खेळणी व्यवसात चालतो, त्यास आता एकत्रित आणि मोठे स्वरूप देण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे जेवर हा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जाणार असून तो आशियातील सर्वांत मोठा विमानतळ ठरणार आहे. विमानतळाच्या जवळच देशातील पहिली ‘टॉय सिटी’ उभारली जाणार आहे.

त्यासाठी यमुना एक्स्प्रेसवे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करीत असून सुमारे ३ हजार कोटींची गुंतवणूक होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडे ९२ भारतीय खेळणी उत्पादकांचे अर्ज आले आहेत, त्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते. यामुळे उत्तर प्रदेशात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.

विशेष म्हणजे औद्योगिक धोरण आखताना खेळणी क्षेत्रासाठी स्वतंत्र विचार करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. खेळणी उत्पादकांना डिझाईनसाठी स्टुडीओ आणि टेस्टींग लॅबची सुविधा देणे, सवलतीच्या दरात एमएसएमई कायद्यांतर्गत जमिन उपलब्ध करून देणे, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक खेळण्यांसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देणे आणि देश – विदेशात होणाऱ्या खेळणी प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यास मदत करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था