आपत्ती व्यवस्थापन करण्या ऐवजी वडेट्टीवारांचा “ब्लेमगेम”; सरकारी अपयशाचे खापर फोडले हवामान खात्यावर


– हवामान विभागाचे अंदाज चुकल्याने सरकारचेही अंदाज चुकले


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या पावसानंतर आता ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. कालच्या पावसात एवढं पाणी का साठलं? यावरून आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवामान खात्यावर खापर फोडले आहे. हवामान विभागाने नीट अंदाज वर्तवला नाही, म्हणून मुंबईमध्ये पाणी साचल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला.

परंतु, राज् सरकारने मुंबईत अद्याप नैसर्गिक आपत्ती का जाहीर केली नाही? अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत का दिली नाही? यावर वडेट्टीवारांनी एक चकार शब्द काढला नाही. मुंबईत नैसर्गिक आपत्ती जाहीर करून आपत्तीग्रस्तांना १० हजारांची मदत देण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र त्यावर ठाकरे – पवार सरकारने अद्याप विचारच केलेला नाही. उलट वडेट्टीवारांसारखे मंत्री ब्लेमगेममध्ये गुंतले आहेत.

‘साधारणपणे १५० ते १७५ मिमी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. ३३० ते ३३५ मिमी पाऊस पडेल, हा अंदाज कोणाचाच नव्हता. हा अंदाज साफ चुकल्याचं मान्य करावं लागेल. हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे आमचेही अंदाज चुकले’, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

हवामान खात्याने २ दिवसात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. अतिमुसळधार म्हणजे २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस असतो. याबाबतची हवामान विभागाच्या वेबसाईटवरची माहितीही काल झी २४ तासने दाखवली होती. मात्र तरीही एवढा पाऊस येईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, त्यामुळे अभ्यास केला १०० मार्कांचा आणि पेपर आला ३०० मार्कांचा, म्हणून थोडीशी गडबड झाली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

आता चांगलीच गडबड झाली, हे पावसाने दाखवून दिलंच. यापुढे हवामान विभाग आणि सरकार यांच्यामध्ये आणखी समन्वय असेल तर पुढची गडबड नक्की टाळता येईल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती