अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ संपला; देशातली मागणी वाढली की होईल सुधारणा; असोचेम अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांचे मत

  • वर्क फ्रॉम होमचा रिअल इस्टेटवर सकारात्मक परिणाम

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेची घसरण जेवढी व्हायची होती तेवढी होऊन गेली आहे. आता अर्थव्यवस्था सुधारायला सुरवात झाली आहे. प्रत्येक अनलॉकमध्ये स्थितीत सुधारणा होत आहे. भारतात स्वत:ची देशांतर्गत मागणी मोठी आहे. ती अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुरेशी आहे, असोचेम आणि नारडेको या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी स्पष्ट केले.

‘दैनिक भास्कर’ने ही बातमी दिली आहे. हिरानंदानी म्हणाले, “कोरोनामुळे चीनविरुद्ध जगात नकारात्मक भावनेची लाट आहे. त्यामुळे अनेक कारखाने चीनमधून बाहेर पडतील. तेथे अनेक कारखाने बंद झाले आहेतच. त्यापैकी बहुतांश व्हिएतनामला तर काही बांगलादेशमध्ये गेले. आता अशा कारखान्यांना आकर्षित करण्यासाठी ईझ ऑफ डुइंग बिझिनेससारखे आणखी चांगले निर्णय घ्यावे लागतील. धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीला वेग द्यावा लागेल.”

  •  कोरोनापासून उद्योगांनी कोणता धडा घेतला असेल तर तो हा की, एका मिनिटात सर्व बदलू शकते. हे नेहमीच घडते. बदल हाच सर्वात स्थिर घटक आहे. आपण बदललेल्या या परिस्थितीशी जळवून घ्यायला हवे. म्हणजे कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीनुसार आपण आपल्या जीवनात आणि व्यवसायात बदल करायला हवा.
  •  वर्क फ्रॉम होमचा रिअल इस्टेटवर सकारात्मक परिणाम
  •  आता वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे लोकांना घर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरात सर्वाधिक गुंतवणूक होईल. या क्षेत्रात या सर्व घटकांचा समावेश करावा लागेल. कोरोनाच्या हिशेबाने घरासाठी नवे मापदंड काय असतील, घरून सर्व कामे करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असेल, डिझाइन कसे असावे‌ हे पाहावे लागेल.
  •  रिअल इस्टेट क्षेत्रासाठी २०१९ हे वर्ष सकारात्मक राहिले होते आणि २०२० मध्ये वाढ होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण लॉकडाऊनचा फटका बसला. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रोख रक्कम मिळेल याची तजवीज सरकारने करायला हवी. वन टाइम लोन रोलओव्हरसारखे कडक पाऊल गरजेचे आहे. रिअल इस्टेटशी २५० पेक्षा अधिक उद्योग जोडलेले आहेत हे सरकारने समजून घेणे गरजेचे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*