अमित शहांनी दिल्लीत करून दाखविले, अरविंद केजरीवालांनीही मान्यही केले

देशाची राजधानी दिल्लीमध्ये चीनी व्हायरसचा उद्रेक सुरू होता. मात्र, गृह मंत्री अमित शहा यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्लीतील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ६७ टक्यांवर पोहोचले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच ही माहिती दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये चीनी व्हायरसचा उद्रेक सुरू होता. मात्र, गृह मंत्री अमित शहा यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्लीतील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ६७ टक्के इतके झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच ही माहिती दिली आहे.

केजरीवाल म्हणाले जून अखेर दिल्लीत रुग्णांची संख्या एक लाखावर जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु चीनी विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणेने उत्तम काम केले. दिल्लीतील लोकांनी नियम पाळले. त्यामुळे ही वाढ थोपविता आली.

जूनअखेर दिल्लीत ८७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ५८ हजार रुग्ण बरे झालेत. दिल्लीत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७ टक्के होती. दिल्लीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही केवळ २६ हजार आहे.

जूनअखेर ६० हजार रुग्ण पॉझिटिव्ह असतील, असा अंदाज होता. दिल्लीत रुग्णांंच्या मृत्यूची आकडेवारी घसरली आहे. दररोज ० ते ६५ रुग्ण दगावतात. हा आकडा १२५ पर्यंत पोहोचला होता, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले.

दिल्लीत चीनी व्हायरसचे रुग्ण आधीच्या तुलनेत कमी होत आहेत. त्यामुळे आता कोरोना परतीच्या मार्गावर आहे, असे काही मान्यवर लोकांकडून समाजमाध्यमांमध्ये पोस्ट टाकल्या जात आहेत. या पोस्टमुळे लोक नियमांचे पालन करणार नाहीत. त्यामुळे दिल्लीतील स्थिती आधीसारखीच होऊ शकते. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका व नियमांचे पालन करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

दिल्लीमध्ये चीनी व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीची सूत्रे आपल्या हाती घेतली. सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेतले. केजरीवाल यांनाही सोबत घेतले. सातत्याने रुग्णालयांना भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. आवश्यक ती मदत दिली. त्यामुळे दिल्लीतील रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*