अक्साई चीन परत घेणे अशक्य नाही , जामयांग नामग्याल यांचा विश्वास


चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळवण्याची वेळ आली आहे. ‘२०२० मध्ये केंद्रात जे सरकार आहे ते १९६२ चं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, असा विश्वास लडाखचे तरुण खासदार जामयांग नामग्याल यांनी व्यक्त केला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळवण्याची वेळ आली आहे. ‘२०२० मध्ये केंद्रात जे सरकार आहे ते १९६२ चं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात, असा विश्वास लडाखचे तरुण खासदार जामयांग नामग्याल यांनी व्यक्त केला.

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीमुळे संपूर्ण देशात संताप आहे. या घटनेमुळे अक्साई चीनची जखम पुन्हा एकदा उघड झाली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही लोकसभेत बोलताना अक्साई चीन परत मिळविण्यासाठी प्रसंगी प्राणाची बाजू लावू, असे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर नामग्याल म्हणाले, देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे पाकिस्तानात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, हेच वक्तव्य पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा केलंय. केंद्र सरकारनं काय करावे हे सरकारने अगोदरच निश्चित केले आहे.

भारत चीन सीमावादाचं समाधान केवळ लडाखच्या नागरिकांना नाही तर संपूर्ण भारताला हवे आहे असे सांगून जामग्याल म्हणाले, सैनिकांना गमावणे आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सामान्य जीवनावर परिणाम आम्हाला नकोय. एकदाच या समस्येवर कायमचा उपाय सर्वांना हवाय. चीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार सुरा खुपसला आहे. या भागाला अक्साई चीन यासाठी म्हटले जाते कारण चीनने त्यावर ताबा मिळवलाय. अक्साई चीन हा भारताचा भूभाग आहे ज्याला चीनने ताब्यात घेतले आहे. हा भाग परत मिळवणे कठीण आहे परंतु, अशक्य नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती