अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात; घरी बसून देता येणार परीक्षा


राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची मंजुरी; अहवाल आल्यानंतर तारखा जाहीर


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील. महिना अखेरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सामंत म्हणाले, “घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो मिळेल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू

सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू.”

“१५ ते ३० दरम्यान होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा गेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून कुलपती या नात्याने राज्यपालांनीही त्याच सूचना केल्या आहेत,” असे सामंत यांनी सांगितलं आहे.

“१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. परीक्षेच्या तारखा संबंधित विद्यापीठं अंतिम करणार आहेत. पण सध्या ज्या तारखा ठरवत आहोत त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील अशीच शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. युजीसीकडे अहवाल दिल्यानंतर ३१ ऑक्टोबपर्यंत निकाल लागण्याचे बंधन विद्यापीठांवर असणार आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था