मनी मॅटर्स : कर्ज व्याजदरात महिलांना मिळणाऱ्या सवलतींची माहिती आहे का…


सध्याचे जग बदलले आहे चूल व मुल सांभाळून महिला आता काम नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहे. नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या आता फार मोठ्या प्रमाणात वाडली आहे. त्याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यातही महिला मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. हे ध्यानात घेवून महिलांना सध्या विविध बॅंका सवलत देत आहेत. मोठ्या कर्जालाही महिलांना व्याजदरात सूट दिली जात आहे. त्याचा लाभ सर्वांनी विषेषतः महिलांनी घेतलाच पाहिजे. गृह, वाहन, वैयक्तिक कर्ज घेतल्यास व्याजदरात, हप्त्यात, प्रक्रिया शुल्कात चांगली सवलत देतात. Money Matters: Are you aware of the concessions that women get in loan interest rates …

एसबीआय, एचडीएफसी सारख्या बँका महिलांना कर्ज देताना वेगवेगळे ऑफर्स देतात. व्याजदरही सामान्य व्याजदरापेक्षा कमीच असतो. नोकरदार महिलांसाठी कर्ज देताना काही अटी शिथिल केलेल्या असतात. त्याचाही महिलांनी लाभ घेतला पाहिजे. अडचणीच्या काळात घेतलेले वैयक्तिक कर्ज घेतानाही बँका कागदपत्रांची पूर्तता करताना फारशी झंझट करत नाहीत. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरून होणा-या व्यवहारावर महिलांसाठी विशेष सवलत दिली जाते. रिव्हार्ड पॉइंटस, कॅशबॅक ऑफर्स, इएमआय सवलत, व्यवहाराची मर्यादा, अन्य बँकाच्या एटीएममधून अमर्यादितपणे पैसे काढण्याची सोय यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

परकी बँका महिलांसाठी विशेष कार्ड उपलब्ध करतात. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे दिवा कार्ड हे महिलांसाठी उपयुक्त असून त्यावर वर्षभरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सोय आहे. नामाकित कंपन्यांच्या सौंदर्यप्रसाधनाच्या सलून आणि स्पा मध्येही महिला वर्गांना बिल देताना काही प्रमाणात डिस्काऊंट दिला जातो. सीटीबँकचे वुमन्स व्हिसा सिल्व्हर कार्ड हे कायमस्वरुपी मोफत कार्ड असून त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच प्रत्येक व्यवहारावर २०० रिव्हार्ड पॉइटसही दिले जातात. त्यामुळे महिलांनी आर्थिक व्यवहार करताना या सवलती कोणत्या आहेत याची चौकशी करून त्याचा फायदा मिळवला पाहिजे.

Money Matters: Are you aware of the concessions that women get in loan interest rates …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात