बंगालमध्ये ३०% मुसलमानांच्या संख्याबळावर पाकिस्तान निर्मितीची पुन्हा धमकी; १९४१ सालच्या काँग्रेसच्या पापाची पुनरावृत्ती!!; पण विषवल्ली उखडण्याची संधीही!!

पश्चिम बंगालच्या निवडणूकीत ममतादीदींच्या पक्षाच्या शेख आलम या नेत्याने मुसलमानांच्या ३० टक्के संख्याबळावर पुन्हा पाकिस्तान निर्मितीची धमकी दिली आहे… पण हे पाप नेमके कोणाचे… काय आहे या धमकीमागचा इतिहास याचा हा आढावा…


विनायक ढेरे

पश्चिम बंगालमध्ये ३०% मुसलमान आहेत. ते दुसऱ्या बाजूला म्हणजे बांगलादेशाच्या बाजूला गेले, तर इथले ७०% हिंदू काय करतील…??, असला विषारी सवाल करण्याची हिंमत ममतादीदींच्या शेख आलम या नेत्याची झाली… हेच तर आजवरच्या पश्चिम बंगालच्या काँग्रेसी – कम्युनिस्ट आणि तृणमूळी राजवटींचे विषारी राजकीय पाप आहे… आणि ते पाप १९४१ पासून २०२१ पर्यंत याच पक्षांच्या सरकारांनी निरंतर चालू ठेवलेय… west bengal assembly election 2021; opportunity to wash the sin of bycott of 1941 census by hindus in bengal

एकदम या लेखात १९४१ सालचा उल्लेख केल्यामुळे कोणाला वाटेल की मी इतिहासातले गाडलेले मुडदे उकरतोय… पण नाही… थांबा… तुम्हाला किंवा कोणालाही कटू वाटला, तरी तो पापाचाच इतिहास आहे… आणि तो धुण्याची संधी ८० वर्षांनी बंगाली जनतेला मिळाली आहे.हा काँग्रेसच्या पापाचा इतिहास आहे… १९४१ हेच ते साल होते, जेव्हा काँग्रेसच्या सगळ्या धुरिणांनी एकत्र येऊन ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन तमाम भारतीयांना केले होते… काँग्रेस नेत्यांना लाख वाटले असेल, की आपल्या आवाहनामुळे अखिल भारतातल्या सर्वधर्मीय जनतेने ब्रिटिशांच्या जनगणनेवर बहिष्कार घातला म्हणून… पण प्रत्यक्षात तसे घडले नाही… होय, बहिष्कार घातला… पण फक्त हिंदूंनी… मुसलमानांनी नाही. अगदी काँग्रेसचे म्हणवणाऱ्या मुसलमानांनीही नाही… आणि इथेच ते पाप घडले… मुसलमानांनी १९४१ च्या जनगणनेत भाग घेतला आणि त्यांनी पुढे सरसावून आपल्या लोकसंख्येची नोंदणी करवून घेतली.

लोकसंख्येच्या या मोजणीत ते ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये कधीही बहुसंख्य नव्हते, तिथेही ते बहुसंख्य ठरले… याचा फटका बंगाल आणि आसामपुरता बोलायचा झाला, तर खुलना आणि सिल्हेट जिल्ह्यांना बसला. तिथे प्रत्यक्षात हिंदू बहुसंख्य असताना केवळ हिंदूंनी जनगणनेत भाग न घेऊन आपल्या लोकसंख्येची नोंदणी केली नाही म्हणून मुसलमान बहुसंख्य ठरले आणि हे दोन्ही जिल्हे फाळणीच्या वेळी त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात सामील करावे लागले.

…मग हेच पाप घुसखोरीच्या रूपातून वर्षानुवर्षे सीमावर्ती भागातील हिंदूंच्या माथ्यावर मारले गेले आणि त्यांनी मारून घेतले… आज त्याचीच परिणिती शेख आलमच्या तोंडून आम्ही इथे ३० टक्के मुसलमान आहोत, या लोकसंख्येच्या अहंकाराच्या रूपाने बाहेर पडली आहे.

१९४१ ते २०२१ कालपट, बरोबर ८० वर्षांचा आहे… आणि इतिहासाची पुनरावृत्ती घडविण्याची विषारी धमकी दिली जात आहे… मधल्या ८० वर्षांच्या काळात बंगालमधला हिंदू समाजाला वाचवायला हिंदुत्वावादी पक्षांना फक्त एकदा राजकीय यश आले, ते म्हणजे भारताच्या फाळणीच्या वेळी बंगालचीही फाळणी करून पश्चिम बंगाल भारतात सामील करून घेताना… डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली हिंदू पुढाऱ्यांनी त्यावेळच्या अखंड बंगाल असेंब्लीला बंगालच्या फाळणीचा ठराव पास करणे भाग पाडले. आणि त्यांनी सध्याचा पश्चिम बंगालचा भाग भारतीय संघराज्यात जोडून घेतला…

श्यामाजींचे कणखर नेतृत्व नसते, तर बंगालच्या हिंदू नेत्यांना बंगाली मुसलमान नेत्यांनी अखंड बंगालच्या स्वतंत्र देशाची भूरळ पाडली होती, त्या भावनात्मक प्रवाहात बंगाली हिंदू नेते वाहून गेले असते आणि आज पश्चिम बंगाल नावाचा प्रांतच भारताचा भाग म्हणून अस्तित्वात आला नसता, हा दारूण असला तरी इतिहास आहे.

हे इतिहासाचे गाडले गेलेले मुडदे उकरून काढणे नाही, तर आजही बंगालचे “हिंदू स्वरूप” काही प्रमाणात का होईना ज्यांनी कायम ठेवले, त्या श्यामाजींच्या देदिप्यमान राजकीय कर्तृत्वाचे हे प्रचंड मोठे योगदान आहे आणि त्याची ही आठवण आहे…

सावरकरांचा खुलना यूथ कॉन्फरन्समध्ये इशारा…

१९४१ च्या जनगणनेपूर्वी १९४० मधला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बंगाल दौरा प्रचंड गाजला होता. वर उल्लेख केलेल्या खुलना जिल्ह्यातच हिंदू यूथ कॉन्फरन्समध्ये त्यांचे आणि श्यामाजींचे भाषण झाले होते. क्रांतिकारक आशुतोष लाहिरी आणि निर्मलचंद्र चटर्जी हे देखील त्यांच्या समवेत होते. हिंदू समाजाने जनगणनेवर अजिबात बहिष्कार घालू नये. हिरीरीने पुढे येऊन आपल्या लोकसंख्येची नोंदणी करावी, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, अशी धोक्याची घंटा या नेत्यांनी खुलना जिल्ह्यातील हिंदू जनतेपुढे वाजविली होती.  पण दुर्दैवाने हिंदू समाजाने ते ऐकले नाही. हिंदू पुरेसे एकवटले नाहीत… तो जिल्हा मुसलमान बहुल नसताना पूर्व पाकिस्तानात गेला. लाखो हिंदुंना निर्वासित व्हावे लागले…

…आणि आज तर बांगलादेशींच्या घुसखोरांच्या बळावर ममतादीदींचा मुसलमान नेता शेख आलम हा पुन्हा एकदा, एकच नव्हे, तर चार पाकिस्तान निर्माण करण्याच्या विषारी धमक्या देतोय… या त्याच्या धमक्या असतील… पण बंगाली हिंदूसाठी मात्र, सावध ऐका पुढल्या हाका… हा अतिशय गंभीर संदेश आहे… त्यावेळी सावरकर – श्यामाजी होते. पाकिस्तानवादी मुसलमानांशी लढण्यासाठी त्यांच्या  हातात कोणतेही कायदेशीर शस्त्र नव्हते… पण आज मोदी – शहा आहेत. यांच्याकडे सीएए आणि एनआरसी ही दोन कायदेशीर शस्त्रे आहेत.

बांगलादेशातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही सगळ्यात प्रभावी शस्त्रे आहेत. ते वापरण्यासाठी मोदी – शहांचे हातही समर्थ आहेत… या अर्थाने मोदी – शहा हे सावरकर – श्यामाजींचे समर्थ वारस आहेत… आणि पाकिस्तान निर्मितीची विषवल्ली उखडून फेकण्याच्या संकल्पशक्तीचा त्यांचा वारसाही तेवढाच जबरदस्त आहे…!! ही मोदी – शहांची अकारण स्तुती नाही… त्यांचे धोरणच बोलतेय. ३७० त्यांनी हटवून दाखवलेय. सीएए – एनआरसी आणून दाखवलेय… हे आपले स्वतंत्र धोरण आहे, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही… उलट वर्षानुवर्षे उराशी बाळगलेले भारताच्या अखंडतेचे राजकीय स्वप्न पूर्ण करण्याची संधी आम्ही घेतोय, असे हे दोन्ही नेते उघडपणे बोलताहेत… आणि हाच तर सावरकर – श्यामाजींचा वारसा आहे. मोदी – शहा तो चालवत आहेत.

२०२१ सालाने बंगाली जनतेलाही पुन्हा संधी दिली आहे… इतिहासातले १९४१ चे पाप धुण्याची… मुसलमानांच्या संख्याबळाचा दर्प आणि पाकिस्तान निर्मितीची मस्ती उतरविण्याची संधी… या संधीचे रूपांतर बंगाली जनता कशात केलेय, हे २ मे रोजीलिं देशाला समजेल.

west bengal assembly election 2021; opportunity to wash the sin of bycott of 1941 census by hindus in bengal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*