विजयनगरम “नवी अयोध्या”; जगनमोहन, चंद्राबाबू “नवे मुलायम”, “नवे लालू”


लालकृष्ण अडवानींची रथयात्रा लालू प्रसादांनी समस्तीपूरात अडविली होती. मुलायम सिंगांनी अयोध्येत गोळीबार केला होता. त्यानंतरचा भाजपचा संघर्षमय विजयी इतिहास नजीकच्या काळात घडलाय. पण याकडे स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यातून “हिस्टरी रिपिट” होते आहे. १९९० च्या दशकात जे अयोध्या आंदोलनात घडले, ते दक्षिणेतली अयोध्या विजयनगरमला घडते आहे. त्यात जगनमोहन – चंद्राबाबू ही जोडगोळी भर घालते आहे… भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची पायाभरणी हे दोन “नवे मुलायम – लालू” करत आहेत.
Vijayanagaram New AyodhyaJaganmohan Chandrababu NEW Mulayam NEW Lalu


विनायक ढेरे

“हिस्टरी रिपिट्स” अशी इंग्रजीत म्हण आहे. अगदी अगदी आंध्र प्रदेशात घडते आहे. आंध्रातले विजयनगरम हे दक्षिणेतली “नवी राजकीय अयोध्या” होण्याच्या दिशेने निघाली आहे आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे अनुक्रमे “मुलायम सिंह यादव” आणि “लालू प्रसाद यादव” in making आहेत.

अयोध्येचा १९९० च्या दशकातला इतिहास पाहा… तोच आंध्रात २०२१ मध्ये घडायला सुरवात झाली आहे… अयोध्येच्या आंदोलनात त्यावेळी लालकृष्ण अडवानी विरूध्द मुलायम सिंह यादव होते… पण अडवानींना समस्तीपूरात अटक करून मधल्यामध्ये लालू प्रसादांनी “अँटी हिंदू” राजकारणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला… आज सुनील देवधर आंध्रात लालकृष्ण अडवानींच्या भूमिकेत आहेत आणि त्यांना अडवायला जगनमोहन रेड्डी तयार असताना मध्येच चंद्राबाबू घुसले आहेत. विजयनगरमला जायला सुनील देवधरांवर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

खरेतर जगनमोहन रेड्डींच्या विरोधात पंगा घ्यायला संघटना बांधणीच्या बळावर भाजप तयार होते आहे. संघटनेची बांधणी मजबूत करायला सुरवात झाली आहे… भाजप दक्षिणेत पायरोवा करण्यासाठी आंध्रातून राजकीय जमीन शोधतोय… तेवढ्यात विजयनगरमचा मुद्दा जगनमोहन रेड्डींच्या राजकीय कारवायांमुळे पुढे आला आहे. त्यांच्या राज्याचे ख्रिश्चनीकरण करण्याच्या हट्टातून हा मुद्दा पुढे आला आहे. जगनमोहन यांचा अजेंडा छुपेपणाने राबविला जात होता, तोपर्यंत फक्त भाजप आवाज उठवत होता. पण संघटना त्यावेळी क्षीण असल्याने तो आवाज बाहेर पोचत नव्हता… आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

विजयनगरमच्या ४०० जुन्या राममूर्ती फोडताच त्याचे पडसाद सगळ्या आंध्राबरोबर देशात उमटलेत. त्यातून भाजपच्या संघटनेला मोठा विषय मिळायलाय. राजकीय चुका जगनमोहन रेड्डी करताहेत. आणि त्यात बरीच वर्षे मरगळून पडलेले चंद्राबाबू नायडू एकदम उठून मैदानात येऊन भर घालताना दिसत आहेत… जगनमोहन रेड्डी विरूध्द भाजप या लढाईत “बीच मे मेरा चांदभाई” म्हणून घुसण्याचा प्रयत्न चंद्राबाबू करताहेत.

याला दुसराही राजकीय अँगल आहे, तो म्हणजे… जगनमोहन यांच्या विरोधात भाजप हिंदू अजेंडा घेऊन मैदानात उतरून यश मिळवणारच असेल तर आपणच तो अजेंडा घेऊन पुढे काय जाऊ नये, असा विचार चंद्राबाबूंनी केला असावा. प्रादेशिक मुद्दा तर जगनमोहन यांनी काढून घेतला. राज्याच्या राजकारणात लढायला आणि अस्तित्व टिकवायला दुसरा मुद्दाच उरला नाही, असे दिसताच चंद्राबाबूंनी भाजपपेक्षा जोरात आरोळी ठोकून जंगनमोहन यांच्यावर ख्रिश्चन सीएमचा शिक्का मारलाय. या निमित्ताने भाजपच्या मुद्द्यावर राजकीय डल्ला मारून हाती काही लागतेय का ते चंद्राबाबूंना बघायचे आहे. यासाठी आपण स्वतःच मैदानात उतरून ते मारण्याचा त्यांचा मनसूबा आहे… अर्थात असे असले तरी प्रत्यक्षात फायदा भाजपचा होताना दिसतोय कारण संघटना वाढ भाजपची होते आहे. आणि ख्रिश्चन सीएमचा मुद्दा जो भाजप सुप्तावस्थेत वापरत होते, तो आता चंद्राबाबूंमुळे उघडपणे भाजपच्या हातात आलाय.

मुद्दा चंद्राबाबूंनी उचलला असला तरी त्याला जोर लावायला चंद्राबाबूंची संघटना तेवढी जोमदार राहिलेली नाही. ती संघटना भाजप बांधतोय.
आणि तेवढ्यात… जगनमोहन रेड्डींनी राजकीय चूक केली आहे… जी मुलायम सिंहांनी १९९० मध्ये केली होती… ती चुक करण्याची दिशा जगनमोहन यांनी पकडली आहे. त्यांनी विजयनगरमला जायला चंद्राबाबूंना परवानगी दिली आहे… पण भाजपच्या सुनील देवधरांना प्रतिबंध केला आहे… यातून जे काही राजकारण आहे ते ख्रिश्चन सीएम विरूध्द हिंदू माजी सीएम असे आंध्रातच होऊ द्या.

Vijayanagaram New AyodhyaJaganmohan Chandrababu NEW Mulayam NEW Lalu

बाहेरचा पक्ष यात यायला नको, असे राजकीय वळण जगनमोहन देऊ इच्छितात. पण त्यांचा हा इरादा चंद्राबाबूंच्या दुबळ्या संघटनेमुळे साध्य होताना दिसत नाही. उलट सुनील देवधरांवर प्रतिबंध लादल्याने भाजप संघटनेत जोश येईल… आधीच संघटना बांधणीच्या अपवर्ड मूडमध्ये असलेले भाजप नेते आणखी जोशात येतील, “ही व्यवस्था” भाजपच्या नेत्यांनी नव्हे, तर खुद्द जगनमोहन यांनी आपल्या “मुलायमी” कृतीतून केली आहे.

अडवानींची रथयात्रा लालू प्रसादांनी समस्तीपूरात अडविली. मुलायम सिंगांनी अयोध्येत गोळीबार केला… त्यानंतरचा भाजपचा संघर्षमय विजयी इतिहास नजीकच्या काळात घडलाय. पण याकडे कोणतेच स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यातून अशी “हिस्टरी रिपिट” होते आहे. १९९० च्या दशकात जे अयोध्या आंदोलनात घडले, ते दक्षिणेतली अयोध्या विजयनगरमला घडतेय. आणि त्यात जगनमोहन – चंद्राबाबू ही जोडगोळी भर घालती आहे… भाजपच्या दक्षिण द्ग्विजयाची पायाभरणी हे दोन “नवे मुलायम – लालू” करत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती