मराठी परिघात कुचंबलेला “सावरकर अभ्यास” आता भेदतोय आंतरराष्ट्रीय कक्षा


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानोत्तर जीवनाकडे विशेषतः त्यांच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक आहे. पण स्वतःला स्वतंत्र म्हणवणाऱ्या विचारवंतांच्या देखील सावरकर अभ्यासाच्या कक्षा मराठी आणि तर्कदुष्ट परिघात कुंचबल्या. सन २००० नंतर सावरकर अभ्यास भेदतोय आता आंतराष्ट्रीय कक्षा… कसा ते वाचा… Veer Savarkar study reaching new hieghts and horizons of international strature


सावरकरांचे अंदमानोत्तर जीवन विशेषतः रत्नागिरीतून त्यांची सुटका झाल्यानंतरच्या राजकीय जीवनाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती पठडीबाज इतिहासकारांची आणि विचारवंतांची राहिली आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांची विशिष्ट भूमिका असणे स्वाभाविक आहे. कारण १९४७ नंतर लगोलग पंडित नेहरूंनी प्रो. नुरूल हसन यांच्या नेतृत्वाखाली इतिहासकारांची समिती नेमून तिला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहायला सांगितले होते.

नुरूल हसन यांनी अर्थातच पंडित नेहरूंना हवा तसा काँग्रेस ओरिएंटेड इतिहास लिहिला. काँग्रेसला विरोध असणाऱ्या नेत्यांचे contribution या इतिहासात येऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

 

अशाच प्रकारच्या काँग्रेस ओरिएंटेशनचे उदाहरण म्हणजे नेहरूंनी प्रो. प्रतूलचंद्र गुप्ता यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा इतिहास लिहायला सांगितला. त्यांना सरकारी archives मधील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. पण गुप्तांनी आझाद हिंद सेनेच्या इतिहासाचा पहिला आराखडा लिहून पाठविल्यानंतर तो तसाच ठेवण्यात आला. तो आजही प्रकाशित करण्यात आलेला नाही. दिल्लीतील आरके पुरमच्या military archives मध्ये तो तसाच पडू असल्याची साक्ष पुरबी रॉय यांनी दिली आहे.

जे नेताजींच्या बाबतीत झाले, तेच सावरकरांच्या बाबतीत झाले. नेहरूप्रणित इतिहासकारांनी सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले. पण स्वतंत्र इतिहासकारांचे काय… त्यांनी सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष का आणि कसे केले… या प्रश्नाचे काही प्रमाणतले उत्तर गांधी हत्या आणि त्यानंतरच्या विशिष्ट प्रभावशाली वातावरणात सापडतात.

Koenraad Elst या बेल्जिअन इतिहासकाराने याचा तटस्थ अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गांधी हत्या ही Right winger`s strategic mistake होती. त्यामुळे गांधी या व्यक्तीचे वेगाने दैवतीकरण झाले. दैवतांची भक्ती होते. चिकित्सा नाही. या सगळ्याचा एकूण फटका गांधीजींच्या वैचारिक विरोधकांना बसला. यामध्ये सावरकरांपासून मानवेंद्रनाथ रॉय यांच्यापर्यंत सर्व नेते होते. त्या काळात गांधी, नेहरू, पटेल हे मोठे नेते ठरले.

सुभाषबाबू, सावरकर, मानवेंद्रनाथ रॉय, जयप्रकाश नारायण, तेजबहादूर सप्रू, बॅ. जयकर, एवढेच काय पण डॉ. आंबेडकर हे नेते झाकोळले गेले. सावरकर, रॉय, आंबेडकर यांची राजकीय चरित्रे लिहिली गेली. पण राज्यशास्त्रीयदृष्ट्या त्यांचा त्या काळात अभ्यास सुरू झाला नाही. तो सुरू झाला, भक्तीभावाने गांधी आणि नेहरूंचा. कालांतराने पटेलही मागे पडले. ठोबळमानाने १९५० ते १९९० हा ४० वर्षांचा काळ असा होता.

डॉ. आंबेडकरांचा सुरूवातीला राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास सुरू होण्यास १९९० चे दशक उजाडावे लागले. तर सावरकरांचा तेवढ्या मोठ्या पातळीवर अभ्यास सुरू होण्यास सन २००० चे दशक उजाडावे लागले. याचा अर्थ यापूर्वी या दोन्ही नेत्यांचा अभ्यासच होत नव्हता असे नाही. तो स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर होत होता ही वस्तुस्थिती आहे. उलट गांधींचे तत्त्वज्ञान आणि नेहरूंचे राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय धोरण यांचा अभ्यास १९५० च्या दशकातच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला होता.

१९७० च्या दशकात दोन विद्वानांनी सावरकरांवर पी एचडी मिळविलेली आढळते. ते म्हणजे डॉ. शं. ना. नवलगुंदकर आणि डॉ. प्र. ल. गावडे. १९८० च्या दशकात सावरकरांचा चिकित्सक अभ्यास करणारे विचारवंत म्हणजे नरहर कुरूंदकर. त्यांनी स्वतंत्रपणे सावरकरांवर ग्रंथ लिहिला नाही. पण विविध ग्रंथांमध्ये त्यांनी सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली.

सावरकरांवर मोजक्या मराठी विचारवंतांनी अभ्यास जरूर केला आहे. यात नवलगुंदकर, गावडे यांच्यापासून य. दि. फडके, शेषराव मोरे, रावसाहेब कसबे यांच्यापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश आहे. पण कितीही म्हटले तरी या विचारवंतांचा परिघ मराठी वाचकापलिकडचा नाही. या सगळ्यांचे ग्रंथ मराठीत उपलब्ध आहेत. हे सगळे सन २००० पूर्वीचे आहेत.

पण सावरकरांवर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास सुरू झाला तो सन २००० च्या दशकात. या अभ्यासाला चालना मिळाली, ती उजव्या विचारसरणीने केंद्रातल्या सत्ताकक्षात प्रवेश केला तेव्हा. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर गांधी आणि डाव्या विचारांना विरोध करणारी उजवी विचारसरणी सत्तेच्या कक्षात प्रवेश करू शकते हे सन २००० पर्यंत शक्य वाटत नव्हते. पण २००० च्या दशकात उजव्या पक्षांच्या सत्तेने राष्ट्रीय पातळीवर आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सावरकर विचारांची दखल घेणे भाग पडले.

उजव्या विचारप्रणालीचा चिकित्सक अभ्यास होऊ शकतो, हेच विद्यापीठीय राज्यशास्त्राच्या विद्वानांना निदान सन २००० पर्यंत मान्यच होत नव्हते. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. सावरकरांच्या विचारांवर आमच्या टेक्स्टबुक्समध्ये फार तर एक प्रकरण असायचे. यापेक्षा अधिक अभ्याससामग्री विद्यापीठ उपलब्ध करवून द्यायचे नाही. किंवा नसायची. विद्यापीठ स्तरावर गांधी आणि डावी विचारप्रणालीच्या अभ्यासाची भरपूर साधने उपलब्ध होती. आज २०२१ मध्ये या स्थितीत बदल झाला आहे.

सावरकरांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. Julia Kelly Swift, A. Shreedhar Menon, Michael Lederle, Siegfried Wolfe, John Zavas, Walter K. Anderson, Lloyd Susane Rudolf, Leo Strauss, शिकागोचे श्रीधर दामले, अनुरूपा सिनार, पौलस्त्य चक्रवर्ती, बिंदू पुरी, ज्योती त्रेहान आणि अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे सावरकरांचे नवे चरित्रकार विक्रम संपत ही सगळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची सावरकर अभ्यासकांची नावे आहेत. ही नावे यासाठी लिहिली आहेत, कारण यांचे अभ्यास सन २००० नंतर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची व्यापकता मोठी आहे आणि आतातर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैचारिक Political Guru म्हणून सावरकरांचा व्यापक अभ्यास सुरू झाला आहे.

वर नोंदविलेल्या अभ्यासकांची मते एकसमान नाहीत. तसे असणेही अपेक्षित नाही. पण त्यांच्यात एक समान धागा आहे, तो म्हणजे या सर्वांनी सावरकरांचा अभ्यास साहित्यिक सावरकर, या संकल्पेनेच्या पलिकडे जाऊन राजकीय विचारवंत सावरकर म्हणून केला आहे. या अभ्यासकांचे दृष्टीकोन चिकित्सक आहेत. तर्ककठोर आहेत. पण तुच्छतेचे नाहीत हे आवर्जून नमूद करावेसे वाटतात. या अभ्यासकांनी आधीच निष्कर्ष काढून नंतर त्याला अनुकूल ठरणारे पुरावे जोडलेले नाहीत.

या लेखात पूर्वी उल्लेख केलेल्या मराठी विचारवंताचे, शेषराव मोरेंचा अपवाद वगळता तसे झाले आहे. त्यांनी विशिष्ट विचारांच्या चष्म्यातून सावरकरांचा अभ्यास केल्याने त्यांचे निष्कर्ष तर्कदुष्ट झाले आहेत. शिवाय या विचारवंतांची अंगभूत मर्यादा त्यांना राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाऊ शकली नाही. ते मराठीच्या परिघातच फिरत राहिलेले दिसतात. त्यामुळे ते साहित्यिक सावरकर, सामाजिक सावरकर यांच्या पलिकडचे राजकीय सावरकर पाहू शकलेले नाहीत. किंबहुना त्यांना तसे सावरकर पाहायचेच नव्हते…!!

Veer Savarkar study reaching new hieghts and horizons of international strature

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात