मेंदूच लावतो आपल्याला चांगल्या किंवा वाईट सवयी


कोणतीही चांगली अथवा वाईट सवय लागणे हे मेंदूत ठरत असते. वाईट सवयींना आपण व्यसन म्हणू शकतो. यासाठी काही टप्पे असतात. सर्वांत प्रथम एखाद्या समाधानाचा किंवा बक्षिसाचा मोह यामुळे मनात किंवा विचारात स्वयंसूचना निर्माण करतो. मेंदूला ती स्वयंसूचना मिळते आणि आपल्या वर्तनाला प्रेरित करणारे संदेश मेंदूतून जाऊ लागतात. नंतर अमुक एक केले, तर मला तमुक गोष्ट मिळेल आणि समाधान किंवा आनंद मिळेल या सूचनेचे रूपांतर मग ती गोष्ट केलीच पाहिजे या विचारात आणि त्यासंबंधीच्या वर्तनात होते. नियंत्रणा पलीकडची ही एक तीव्र प्रेरणा असते. तिला अनुसरून मेंदू तसे वर्तन करण्याची आज्ञा देतो आणि त्यानुसार आपण ती गोष्ट करतो. यामागे ते समाधान मिळवण्याची ओढ असते. सूचना मिळाल्यावर ओढ निर्माण होते आणि त्या तीव्र इच्छेतून आपण जे वागतो किंवा जो विचार करतो ती गोष्ट. म्हणजेच सवय किंवा व्यसन म्हणतात. The brain instills good or bad habits in you

या वर्तनाला जेवढे जास्त अडथळे असतील किंवा प्रखर विरोध असेल तेवढी ती गोष्ट घडण्याची शक्यता कमी असते. कोणत्याही सवयीच्या किंवा व्यसनाच्या चक्रातला हा अंतिम टप्पा असतो. स्वयंसूचना ही समाधान जाणून घेणारी यंत्रणा असते. ते समाधान मिळण्यासाठी होणारी तगमग ही ओढ असते. ते समाधान मिळवण्यासाठी केलेली हालचाल आणि धडपड म्हणजे प्रतिसाद असतो. यातून जे फलित मिळते त्यातून समाधान आणि आनंद तर मिळतोच, पण काही शिकवण देऊन जाते. कुठल्याही समाधानाचे मुख्य काम तुमची तीव्र ओढ तृप्त करणे. अन्नपाण्याची ओढ आपली भूक भागवते, शरीराला उर्जा देते, कामातील बढती आपल्याला जास्त आर्थिक प्राप्ती देते, स्टेट्स वाढवते. समाधानातून आणखी एक गोष्ट मिळते, ती म्हणजे मेंदूमध्ये त्या समाधानाचा एक ठसा उमटतो, एक सुखद स्मृती बनते. मानसशास्त्राच्या संशोधनात एखादी गोष्ट आपण वीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केली, तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते. एखादे नवे वागणे जेव्हा सतत होते, तेव्हा त्याला सवय म्हणतात.

The brain instills good or bad habits in you

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात