shrikrushna Umrikar Article On Sachin vaze Case and Sharad pawar

पवारांच्या घशातला काटा

(Sachin vaze Case) परमवीर यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे पत्र जाहीर करून सरकारलाच सुरूंग लावला. परमवीर यांचे आरोप खोटे असतील तर सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करायला हवी. मात्र तसे काही न करता सरकारच्या बचावासाठी पवार पुढे आले. त्यांचा हेतू सारवासारव करण्याचा होता. मात्र पत्रकारांनी नेमके प्रश्न विचारून पवारांना खिंडीत गाठले आणि त्यांनी अस्पष्ट बडबड करून प्रकरण जास्त गुंतागुंतीचे करून टाकले.

shrikrushna umrikar article

जिलेटीनच्या २० कांड्या येवढा मोठा स्फोट करू शकतात असे कुणालाच वाटले नव्हते. नंतर मनसुख हिरेनची हत्या झाली. प्रकरण NIA कडे गेले आणि तिथेच डाव उलटला!

अंबानींच्या घराबाहेर स्फोटके का ठेवली होती हे तसे करणाराच सांगेल किंवा वाजे सांगेल. अन् गंमत अशी की प्रकरण NIA कडे गेल्यावर तपासाची दिशा ओळखून किंवा आपण काय गुन्हा केला आहे याची जाणीव ठेवून वाजेंनी “आता जगाचा निरोप घ्यायची वेळ आली आहे…” असे जाहीर केले होते ते का याचा खुलासा आता होतो आहे.

या सगळ्या प्रकरणातला कच्चा दुवा म्हणजे वाजे. त्याला NIA ने अटक केल्यानंतर तो पोपटासारखा बोलणार होताच. आणि आपण बोलू लागलो तर अनेक उच्चपदस्थांची नावे घेऊ आणि तसे झाल्यास आपली हत्या होवू शकते या भितीनेच त्याने जगाचा निरोप घ्यायची वेळ आली असल्याचे जाहीर केले.

वाजे जसा बोलू लागला तसे रहस्य उलगडत गेले. आणि वाजे चे वरिष्ठ अधिकारी परमवीर यांचा बळी देऊन आपली खुर्ची वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केला आणि परमवीर यांची बदली करून टाकली.

पण तोवर परमवीर यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे पत्र जाहीर करून सरकारलाच सुरूंग लावला. परमवीर यांचे आरोप खोटे असतील तर सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करायला हवी. मात्र तसे काही न करता सरकारच्या बचावासाठी पवार पुढे आले. त्यांचा हेतू सारवासारव करण्याचा होता. मात्र पत्रकारांनी नेमके प्रश्न विचारून पवारांना खिंडीत गाठले आणि त्यांनी अस्पष्ट बडबड करून प्रकरण जास्त गुंतागुंतीचे करून टाकले.

 • या प्रकरणात एकटा वाजे गुंतला आहे का?्र
 • जिलेटीन ठेवण्याच्या कारस्थानात कोण कोण सामील होते?
 • गृहमंत्री महिन्याला शंभर कोटी रुपयांची खंडणी मागत?
 • जर गृहमंत्र्यांची खुर्ची जाणार असेल तर ते चुपचाप बळी जाणार का परमवीर यांच्या प्रमाणे इतरांची नावे सांगणार?
 • त्यांनी इतरांची नावे पुढे आणू नये म्हणून पवारांना त्यांचा राजीनामा मागता येत नाही?
 • पवारांची ही अगतिकता ओळखून परमवीर आक्रमक झाले आहेत का?
 • या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची करणार्‍या परमवीर यांच्या जवळ कोणते पुरावे आहेत? येवढा उच्चपदस्थ अधिकारी विना पुरावा आरोप करतोय का? तसे असल्यास सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही?
 • जर वाजे माफीचा साक्षीदार झाला तर प्रकरणाची पाळेमुळे कुठवर गेल्याचे समोर येईल?
 • NIA नेत्यांना/मंत्र्यांना चौकशी साठी बोलावेल का?

या प्रश्नांची उत्तरे समोर येतीलच. तोवर सारवासारव करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र पुरावे नष्ट करून गुन्हेगारांना वाचवता येणार नाही असे आता वाटत आहे. येवढेच नाही तर गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या आरोपांना उत्तर देताना पवारांना घाम फुटणार यात शंका नाही. परमवीर यांना मोठ्या राजकारण्यांचा आशिर्वाद असला पाहिजे.

अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेल्या गाडीचे प्रकरण पवारांच्या घशातला काटा सिद्ध होते आहे. पहायचे हे आहे की हा काटा पवार घशातून बाहेर काढतात का बळी जातात?

 

महत्त्वाच्या बातम्या

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*