महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडेच, राष्ट्रवादीला कोणतीही कमिटमेंट नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण


प्रतिनिधी

नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिले. सामनाच्या रोखठोक सदरातून त्यांनी हीच भूमिका मांडली होती. त्यावर संजय राऊतांनी अधिक स्पष्टीकरण दिले. hiv Sena CM will be replaced after 2.5 years. When 3 parties formed govt, they committed & decided that CM will be Uddhav Thackeray for 5 years.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये मतभेद नाहीत. त्या विषयावर नव्याने कोणतीही वाटाघाटी नाही. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील ही कमिटमेंट आहे. असे मी रोखठोक मध्ये म्हटलेच आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसा इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणलाही वाटा दिलेला नाही.



राष्ट्रवादी काँग्रेसला देखील नाही. संपूर्ण काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे. स्वतः शरद पवार यांनी देखील परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीरपणे हेच वक्तव्य केले आहे.

अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रिपदासाठी दावा करतील आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडेल. या वादामुळे राज्यात नव्या राजकीय घटनांना वेग येईल. असे दावे फक्त प्रसारमाध्यमे करीत आहेत. त्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ५ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन शिवसेनेला देण्यात आले आहे, असे राऊत यांनी पुन्हा सांगितले.

संजय राऊत म्हणाले, “ आमच्या कुणाचाही मनात संभ्रम नाही. पण प्रसिद्धी माध्यमांमुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आणि मी त्या प्रक्रियेतील एक घटक होतो, अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत, मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही.

hiv Sena CM will be replaced after 2.5 years. When 3 parties formed govt, they committed & decided that CM will be Uddhav Thackeray for 5 years.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात