विधान परिषदेच्या निमित्ताने पवारांची “सुमडीत कोंबडी”


दोन हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांना खाऊ का गिळू करत असताना शरद पवार हे राष्ट्रवादीच्या बांधबंदिस्तीचे काम करत आहेत. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादीपासून दूर गेलेला समाज घटक पुन्हा जोडून घेऊ इच्छित आहेत. मते कापणारे छोटे पक्ष, दुय्यम नेते फोडून पवार( sharad pawar latest news ) आपले काम साध्य करू पाहात आहेत. आपली “जुगाड क्षमता” वाढवून घेणे हा त्यांचा लिमिटेड उद्देश्य आहे.


विधान परिषदेसाठी “निवडक – वेचक” नावे निवडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचीच “सुमडीत कोंबडी कापली” आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत ठरलेल्या यशवंत भिंगे यांना विधान परिषदेत जाण्याची संधी देऊन पवारांनी चव्हाणांबरोबरच काँग्रेसला खिजवले आहेच पण राष्ट्रवादीची अनेक ठिकाणी मते कापणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला देखील कामाला लावले आहे. प्रकाश आंबेडकर हे शरद पवारांना विश्वासघातकी राजकारणावरून सतत expose करत असतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचीच मोठ्या प्रमाणावर मते घेणारी माणसे पवारांनी या निमित्ताने फोडून दाखविली आहेत.

इतर माध्यमांनी विधान परिषदेची चर्चा उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षे यांच्यावर केंद्रीत करून शिवसेना केंद्रस्थानी ठेवली आहे. पण पवारांच्या या “सुमडीत कोंबडीकडे” दुर्लक्ष केले आहे किंवा त्यांच्या राजकीय खेळीला दुय्यम स्थान तरी दिले आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप हे दोन हिंदुत्वावादी पक्ष एकमेकांना खाऊ की गिळू करत असताना इकडे शरद पवार राष्ट्रवादीची डागडुजी करून फेरबांधणीच्या उद्योगात गुंतले आहेत. पवारांचे हे काम नेहमीच्या राजकीय शांततेत ज्याला ग्रामीण बोली भाषेत “सुमडीत कोंबडी कापणे” असे म्हणतात, तसे चालू आहे.

त्यातच सध्या भाजपचे नेते पवारांना फारसे टार्गेट करत नाहीत. आशिश शेलार तर नाहीच नाही. त्यांना कायम ठाकरेंची राजकीय पापे तेवढी दिसतात. पण ठाकरेंच्या मागे उभे राहणाऱ्या पवारांची मोठी राजकीय पापे त्यांना दिसत नाहीत. त्यामुळे ते हिंदुत्ववादी ठाकरेंच्या मागे जास्त लागलेले दिसतात. पवारांना ते “सिलेक्टिवली” आपल्या टार्गेटमधून वगळतात. त्यांनी आपल्या घरात भिंतीवर चाणक्याचे चित्र लावलेय की काय? कळायला मार्ग नाही.sharad pawar latest news

अर्थात विधान परिषदेच्या निमित्ताने पवारांचा राष्ट्रवादीच्या बांधबंदिस्तीमागे उद्देश्य लिमिटेड आहे. त्यांना राष्ट्रवादीची मूलभूत ६० – ७० जागांची राजकीय मर्यादा माहिती आहे. गेल्या दोन निवडणुकांत त्यात नेमकी २५ ते ३० जागांची उणीव पडली आहे, ती भरून त्यांना भरून काढायची आहे. त्या जागांची आणि त्यासाठी लागणाऱ्या मतांची बेगमी शिवसेना, भाजप किंवा काँग्रेस यांच्यासारखे मोठे पक्ष फोडून होणार नाही. तेवढे हे पक्ष फुटणार नाहीत. तेवढी पवारांची क्षमता नाही. उलट राष्ट्रवादीसाठी उणीव राहिलेल्या मतांची आणि जागांची बेगमी वंचित बहुजनसारखा मते कापणारा पक्ष, त्याचे दुय्यम फळीतले नेते फोडून होणार आहे.

तसेच गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीपासून दूर गेलेला समाजघटक पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करून होणार आहे. कोणतीही छोटी – मोठी पदे देऊन हे काम भागण्यासारखे आहे. एकनाथ खडसेंसारखा भाजपचा मोठा नेता फोडून वातावरण निर्मिती होईल, पण मतांची आणि जागांची बेगमी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होईलच याची खात्री नाही. किंबहुना तसे होण्याची फारशी शक्यता नाही. उलट छोटे पक्ष फोडून आणि दुय्यम नेते गळाला लावून जेवढा मतांच्या बेगमीचा फायदा होईल, तेवढा पवारांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

sharad pawar latest news

विधान परिषदेत यशवंत भिंगे आणि आनंद शिंदे यांना पाठवून हे मराठवाड्यातला धनगर आणि मुंबईतला दलित समाज जोडण्याचा पवारांचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या या यशाची टक्केवारी कितीही कमी राहिली तरी सध्याच्या राष्ट्रवादीच्या अवस्थेशी ताडून बघता ती “प्लसच” राहील कारण हे समाज घटक पवारांपासून पुरते दूर गेले आहेत. हे दोन्ही समाज घटक राष्ट्रवादीकडे फारसे कधी नव्हतेच. पण जे मिळायचे ते मिळेल या हेतूने भिंगे आणि शिंदे यांच्या उमेदवारीकडे राष्ट्रवादी पाहताना दिसते आहे.

मुंबईत शिवसेना – काँग्रेस – भाजप या त्रिकोणीय लढ्यात राष्ट्रवादीला स्थान शोधावे लागेल. तेथे आनंद शिंदे यांच्या रूपातला नवा राजकीय दलित चेहरा, सेक्शन उपयोगी पडू शकेल, असा पवारांचा होरा असावा. शिवसेना जेवढी कमी होईल, तेवढे अन्य पक्षांबरोबर पवारांनाही हवे आहेच कारण त्यातूनच तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहेत. “जुगाड क्षमता वाढवणे” हे तर पवारांच्या राजकारणाचे मूलभूत तत्त्व राहिले आहे. विधान परिषदेसाठी नावे ठरवताना या पेक्षा काही वेगळे घडलेले नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था