मनी मॅटर्स : आपल्या घरातील बजेटचा वेळोवेळी आढावा घ्या


अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक विषयांवरील संभाषण टाळले जाते. पैसा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बाबतीत केंद्रस्थानी असायला नको असे तरी त्यावर चर्चा करणे गरजेचे असते. कारण पैसा आयुष्याचा महत्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कर्जबाजारी झालेला असलात, किंवा कुटुंबासाठी काही मोठे काम करण्यासाठी झटत असलात तर तुम्हाला त्याबद्दल कुटुंबातील सर्वांशी संवाद साधणे गरजेचे आहे. जोडीदाराला तसेच घरातील इतरांना आपले आर्थिक उद्दिष्ट आणि जबाबदारी सांगितली पाहिजे आणि आपल्या मुलांना तुमचे ज्ञान आणि अनुभव दोन्हीचा फायदा करून दिला पाहिजे. त्यासाठी नेहमी आपल्या जोडीदारासोबत बसून बजेट करा. Review your home budget from time to time

आपले महिन्याचे खर्च आणि इतर जबाबदाऱ्या मांडा. वेळोवेळी त्याचा आढावा घ्या आणि तुमच्या मिळकतीतील बदल, खर्चांतील बदल इत्यादीनुसार त्यात आवश्यक ते बदल करा. मुलांनाही यात सामील करा, ज्याने त्यांना बजेट करणे शिकता येईल. बजेट करून झाल्यावर तुमच्या जोडीदार आणि मुलांसोबत खर्च कमी करण्याच्या आणि बचत वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करा. तुम्ही मुलांना नव-नवीन कल्पना मांडायला सांगू शकता आणि उत्तम कल्पनांसाठी त्यांना काही बक्षीस देऊ करू शकता. अशाने त्यांना बचत करण्याची सवय लागेल. जर तुमच्या जोडीदाराला किंवा आई-वडिलांना तुमच्या गुंतवणुकींबद्दल माहिती नसेल, तर अचानक गरज भासल्यास आणि तुम्ही त्यांच्या सोबत नसल्यास त्यांना काहीच करता येणार नाही. अशा परिस्थितीत ते पैसे काढू शकणार नाहीत. म्हणून त्यांना तुमच्या सर्व गुंतवणुकी आणि त्यांचा कारभार माहीत असला पाहिजे. या क्षणी रिटायरमेंट फार पुढची घटना वाटू शकते, पण त्याची तयारी जेवढ्या आधी सुरू कराल तेवढा तो काळ सुसह्य होईल. कोरोनाच्या काळात तर याची सर्वाधिक गरज आहे हे लक्षात ठेवा.

Review your home budget from time to time

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात