मिलेनियर ‘मॅगसेसे कुमार’ची नौटंकी


देशातील रोजगाराविषयी दररोज मोदी सरकारला प्रश्न विचारताना (प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहेच) आपल्याच एनडीटीव्हीने जवळपास ७० ते ७५ हून अधिक लोकांना नोकरीवरून का काढून टाकले, हे विचारण्याची त्यांची हिंमत होत नाही. अर्थात, नौटंकीबाज मिलेनियर रविश कुमारांकडून अशी अपेक्षा करणेच चूक आहे. ravish kumar news


कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिव्य ज्ञान देताना भगवान श्रीकृष्णांनी “या जगात जे काही आहे ते सर्व मीच आहे, माझ्याच आज्ञेने सर्व काही घडते” असे सांगितले होते. सांप्रतकाळी भारताच्या पत्रकारितेमध्येही “पत्रकारिता म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजेच पत्रकारिता आहे” असा आव एक व्यक्ती आणत असतो. तो व्यक्ती म्हणजे वन अँड ओन्ली मिलेनियर ‘मॅगसेसे कुमार’ उपाख्य रविश कुमार. ravish kumar news

 

एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीचे मिलेनियर पत्रकार रविश कुमार यांची नौटंकी उघडकीस आणली ती दूरदर्शनचे वरिष्ठ संपादक आणि गेली अनेक वर्षे आपल्या खास संयत आणि अभ्यासू शैलीने पत्रकारिता करणाऱ्या अशोक श्रीवास्तव यांनी. तर झाले असे की रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पवार – ठाकरे सरकारने त्यांच्या घरातून अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत काय करण्यात आले, याचे व्हिडीओ लगेचच व्हायरल झाले.

आपल्या रविश कुमारांनीही ते व्हिडीओ पाहिले आणि त्यांनी त्याविषयी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहिली. आता तुम्हाला वाटेल की वैचारिक आणि राजकीय मतभेद असले तरी एक पत्रकार आणि आपण सध्या ज्या एनडीटिव्हीमध्ये काम करतो, त्यातच एनडीटिव्हीमध्ये कधीकाळी काम करणाऱ्या पत्रकाराला अटक झाल्यावर रविश कुमारांनी त्या घटनेचा निषेध केला असेल. पवार – ठाकरे सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी करते, त्याबद्दल लिहिले असेल. मात्र, तसे काहीही घडलेले नाही. रविश कुमारांनी अर्णब गोस्वामी यांना नेहमीप्रमाणे ज्ञानवाटप केले आणि त्यांच्या स्वकमाईच्या घराविषयी अतिशय नकारात्मक टिप्पणी केली. त्यात त्यांनी म्हटले की “अर्णब गोस्वामी यांचे शानदार घर पाहून मी असंघटीत क्षेत्रातील मजुराप्रमाणे गार पडलो”.

 

आता हे वाचून कोणालाही असेल वाटेल की रविश कुमार हे १० बाय १० च्या एका खोलीत राहतात, एनडीटीव्ही त्यांना अगदी पाच हजार वगैरे पगार देते आणि रविश कुमार यांना एखाद्या वेठबिगारासारखे वागविले जाते. मात्र, अशोक श्रीवास्तव यांनी एक ट्विट केले, त्यामध्ये रविश कुमारांची संपत्ती पाहून कदाचित अर्णब गोस्वामीलाच असंघटीत क्षेत्रातील मजुर असल्याचा फिल येईल. रविश कुमारांची संपत्ती आहे ती २० मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल १४३.८२ कोटी रूपये आहे. म्हणजे दर महिन्याला रविश कुमार ३० हजार डॉलर्स अर्थात सुमारे २२ लाख रुपये कमावतात.

 

आता स्वत: मिलेनियर असताना त्या अर्णब गोस्वामीच्या घराविषयी बोलायचा रविश कुमारांना हक्क नाही. मात्र, जगातील सर्व विषयांवर म्हणजे हवामान बदल ते सेक्स, राजकारण ते समाजकारण, कला ते अभियांत्रिकी, शिक्षण ते वैद्यकीय आणि सध्या कोरोना; अशा अनेक विषयांवर रविश कुमार अगदी अधिकारवाणीने बोलत असतात. त्यामुळे अर्णबच्या घराविषयी बोलण्याचा त्यांना आपोआपच अधिकार प्राप्त होतो.

 

मात्र, रविश कुमार ज्याप्रमाणे अर्णबच्या घराविषयी, त्यांच्या संपत्तीविषयी बोलतात तशीच हिंमत ते राडिया टेप्स प्रकरणात दलाली खाणाऱ्या त्यांच्याच माजी सहकारी बरखा दत्त यांच्याविषयी कधी बोलतील का ?, किंवा व्होट फॉर नोट प्रकरणात स्टिंग ऑपरेशन करून ऐनवेळी काँग्रेसच्या सांगण्यावरून ते प्रदर्शित न करणाऱ्या राजदीप सरदेसाई यांना स्टिंग न दाखविण्यासाठी ‘नेमका किती व्यवहार झाला’, हे विचारण्याची हिंमत दाखवतील का ?, किंवा एनडीटिव्हीचे मालक आणि संपादत प्रणय रॉय यांच्या आर्थिक गैरव्यवहारांविषयी विचारण्याची हिंमत रविश कुमार दाखवतील का ?. खरे तर तेवढेही विचारण्याची गरज नाही, त्यांनी फक्त बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, निधी राजदान, निधी कुलपती या आपल्या एनडीटिव्हीमधल्या विद्यमान आणि माजी वरिष्ठ सहकाऱ्यांना विचारावे की दिल्ली – एनसीआर आणि ल्युटन्स दिल्लीमध्ये त्यांचे बंगले कसे उभे राहिले ?.

ravish kumar news

मात्र, रविश कुमार तसे करणार नाही. कारण तसे केल्यास काय होईल, याची त्यांना जाणीव आहे. त्यांना दररोज फक्त नकारात्मकता आणि डावा अजेंडा रेटायचा आहे. म्हणूनच देशातील रोजगाराविषयी दररोज मोदी सरकारला प्रश्न विचारताना (प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहेच) आपल्याच एनडीटीव्हीने जवळपास ७० ते ७५ हून अधिक लोकांना नोकरीवरून का काढून टाकले, हे विचारण्याची त्यांची हिंमत होत नाही. अर्थात, नौटंकीबाज मिलेनियर रविश कुमारांकडून अशी अपेक्षा करणेच चूक आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था