भारत बायोटेकच्या एमडींची खंत त्यांच्या एकट्याची नव्हे, तर सगळ्याच भारतीय कंपन्यांची!!

कोणत्याही क्षेत्रातली भारतीय कंपनी यशस्वी होत असेल, तर तिला मागे खेचण्याची कारणे दोनच… १. व्हेस्टेड इंटरेस्ट आणि २. भारतीय कंपन्यांच्या क्षमतेवर, कौशल्यावर अविश्वास… या दोन कारणांचा विषारी विळखा भारतीय कंपन्यांच्या गळ्यापासून कधी सुटलाच नाही. तो सध्याचे सरकार सोडवायचा प्रयत्न करतेय तर त्यामध्ये अडथळे आणले जाताहेत. ते संशोधन, मंजुरी आणि मान्यतेच्या पातळीवरचे आहेत… आणि हे अडथळे ओलांडून एखादी कंपनी यशस्वी ठरलीच तर… परसेप्शनचे अडथळे निर्माण करून तिला मागे खेचले जात आहे… भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी व्यक्त केलेल्या खेद आणि खंतीचा खरा हा आहे…!! Many people are gossiping everything in different directions to just backlash on Indian companies


विनायक ढेरे

कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लस कोव्हॅक्सिन या लसीचे राजकारण झालेय. आपल्या देशात संशोधन – विकास यांच्या गप्पा राजकारणांच्या तोंडी लावण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय येत असतानाच, भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी आज ऑनलाइन प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी खंत व्यक्त केलीय ना… ती खरंच हजारो भारतीयांच्या मनावर ओरखडा काढते…

आपल्या देशात संशोधन, संवर्धनाला आधीच वाव कमी, त्यातून ब्रेन ड्रेनसारख्या समस्येला देशाला सामोरे जावे लागले… तरीही आपले राजकारणी सुधारत नाहीत… हेच यातून दिसते. कृष्णा इल्ला यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये परखड शब्दांत खंत व्यक्त केलीय, “फक्त भारतीय कंपन्यांच्या क्षमतेवर आणि कौशल्यावर शंका व्यक्त केल्या जातात. आम्हालाच राजकीय टीका टिपण्यांना सामोरे जावे लागते. आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील कौशल्यात कुठेही कमी नाही. जागतिक स्पर्धेत उतरून आम्ही आमची वैज्ञानिक, संशोधन, संवर्धन, निर्मिती क्षमता आणि कौशल्य सिद्ध करतो, तरीही आम्हालाच शंका आणि प्रश्नचिन्हांना सामोरे जावे लागते,”… ही ती खंत आहे… कृष्णा यांनी व्यक्त केलेली खंत फक्त आजची नाही… तर ती कोट्यवधी गुणवत्तावान भारतीयांची आणि शेकडो भारतीय कंपन्यांची वर्षानुवर्षांची खंत आहे… खरेतर ही खदखद आणि संताप आहे… पण दुर्दैवाने तो सार्वजनिकरित्या व्यक्त होत नाही…

बरं हे फक्त वैद्यकीय किंवा औषध निर्माण क्षेत्रातच आहे, असे नाही… तर जवळ जवळ सर्वच क्षेत्रांमध्ये आहे… सामाजिक औदासिन्यापासून राजकीय बेमुर्वतखोरपणा पर्यंत त्याच्या कारणांची रेंज आहे… कृष्णा यांनी त्याला आज तोंड फोडले आहे… या निमित्ताने खरेच या विषयावर गंभीर विचार मंथन व्हायला पाहिजे आहे… मग त्यावरून कितीही राजकीय भांडणे झाली तरी चालतील… त्याला तोंड देण्याची क्षमता सुबुध्द भारतीय समाजाने ठेवली पाहिजे…

 

कृष्णा यांनी व्यक्त केलेल्या खेदाचे दुसरे उदाहरण संरक्षण क्षेत्रात दिसते. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे भारतीय कंपन्या सरकारच्या दारात संरक्षण उत्पादन क्षेत्रात संशोधन – संवर्धन आणि निर्मितीची परवानगी मागण्यासाठी जात होत्या. वेगवेगळ्या सरकारांच्या विनवण्या करीत होत्या… सीआयआय, फिक्कीपासून अनेक उद्योग संघटना त्याचे प्रस्ताव सादर करीत होत्या. पण भारत सरकार नावाचा हत्ती अथवा अजगर तसाच पडून होता… प्रस्तावांवर वर्षानुवर्षे धुळीचे थरच्या थर साचले.

टाटा, किर्लोस्कर, महिंद्रा, बिर्ला यांच्या सारख्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या उद्योगपतींच्या, टॉप इंजिनिअर्सच्या आणि संशोधकांच्या तीन – तीन पिढ्या तशाच गेल्या… पण त्यांना भारतात संरक्षण साहित्य संशोधन आणि उत्पादनाची संधी मिळाली नाही… देशाने आपले निर्मिती, उत्पादन धोरण बदलले नाही. आयातीवरचा भर कमी केला नाही. भारतीय कंपन्यांना संधी दिली नाही… ही दारूण वस्तुस्थिती आहे… जरा कै. शंतनुराव किर्लोस्करांचे कॅक्टस अँड रोजेस वाचा… उघडतील डोळे आणि कदाचित बघाल नीट…!!

Many people are gossiping everything in different directions to just backlash on Indian companies

कोणत्याही क्षेत्रातली भारतीय कंपनी यशस्वी होत असेल, तर तिला मागे खेचण्याची कारणे दोनच… १. व्हेस्टेड इंटरेस्ट आणि २. भारतीय कंपन्यांच्या क्षमतेवर, कौशल्यावर अविश्वास… या दोन कारणांचा विषारी विळखा भारतीय कंपन्यांच्या गळ्यापासून कधी सुटलाच नाही… तो सध्याचे सरकार सोडवायचा प्रयत्न करतेय… तर त्यामध्ये अडथळे आणले जाताहेत… ते संशोधनाच्या पातळीवरचे आहेत. मंजुरीच्या पातळीवरचे आहेत. मान्यतेच्या पातळीवरचे आहेत… आणि हे अडथळे ओलांडून कोणी कंपनी कोणत्या क्षेत्रात यशस्वी ठरलीच तर… परसेप्शनचे अडथळे निर्माण करून तिला मागे खेचायचे काम सुरू आहे…भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी व्यक्त केलेल्या खेद आणि खंतीचा खरा हा आहे…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*