जरा याद करो कुर्बानी …! शेर ए पंजाब…पंजाब केसरी…लाला लजपत राय


माधवी अग्रवाल

भारतभूमीत नेहमीच नायकांनी जन्म घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात असे अनेक ध्येयवादी नायक होते ज्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना आपल्या जीवाचीही पर्वा नव्हती. शेर-ए-पंजाब लाला लाजपत राय त्यातीलच एक वीर . लाला लाजपत राय हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान सेनानी होते ज्यांनी देशाच्या सेवेसाठी आपले प्राण अर्पण केले आणि आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशाला समर्पित केला. Just remember the sacrifice Sher A Punjab… Punjab Kesari Lala Lajpat Rai

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक धडाडीचे आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या लाला लजपत राय यांची आज जयंती . स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना ‘पंजाब केसरी’ या नावाने ओळखले जाते.

लाला लाजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील लाला राधाकृष्ण अग्रवाल हे पेशाने शिक्षक होते आणि उर्दू प्रसिद्ध लेखक होते. सुरुवातीपासूनच लजपत राय यांना लिखाण आणि भाषणात खूप रस होता. लाला लजपत राय हे पेशाने वकील होते. त्यांनी हिसार आणि लाहोरमध्ये वकीली सराव सुरू केला. लाला लाजपत राय यांना शेर-ए-पंजाब ची उपाधी देउन लोकांनी त्यांना गरम दलाचा नेता मानले. लाला लाजपत राय यांना आत्मनिर्भरतेतून स्वराज्य आणायचे होते.

1897 and आणि 1899 मध्ये त्यांनी दुष्काळात पीडितांची तन-मन-धनाने सेवा आणी मदत केली. या काळात देशात भूकंप आणि दुष्काळात ब्रिटीश राजवटीने काहीही केले नाही. स्थानिक लोकांसह लालाजींनी अनेक ठिकाणी दुष्काळात शिबिरे आयोजित करून लोकांची सेवा केली.

त्यानंतर 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली तेव्हा लाला लाजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि विपिनचंद्र पाल यांच्यासारख्या आंदोलनकर्त्यांशी हातमिळवणी केली आणि इंग्रजांच्या या निर्णयाचा निषेध केला . देशभरात स्वदेशी चळवळ चालविण्यात आणि पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यानंतर अशी वेळ आली जेव्हा इंग्रजांनाही लालाजींच्या लोकप्रियतेची भीती वाटू लागली. लाला लालजपत राय यांना 1914-20 पर्यंत भारतात येण्याची परवानगी नव्हती. पहिल्या महायुद्धात भारताकडून सैनिक भरती करण्यास त्यांचा विरोध होता. ब्रिटिश सरकारला हे माहित होते की लाल बाल (बाळ गंगाधर टिळक) आणि पाल (विपिन चंद्र पाल) हे असे प्रभावशाली लोक आहेत की ज्यांचे जनता अनुकरण करते त्यांच्या शब्दांना मानते . जेंव्हा ब्रिटिशांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लालाजींना भारतात येऊ दिले नाही तेंव्हा ते अमेरिकेत गेले. त्यांनी ‘यंग इंडिया’ मासिकाचे संपादन व प्रकाशन केले.न्यूयॉर्कमध्ये इंडियन इनफार्मेशन ब्यूरोची स्थापना केली. याखेरीज इंडिया होमरुल ही आणखी एक संस्था स्थापन केली .

1920 मध्ये ते भारतात आले तोपर्यंत त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती. यावर्षी कलकत्त्यात कॉंग्रेसच्या एका विशेष अधिवेशनात ते गांधीजींच्या संपर्कात आले आणि असहकार चळवळीचा भाग झाले. लाला लाजपत राय यांच्या नेतृत्वात असहकार चळवळ पंजाबमध्ये जंगलीच्या अग्निसारखी पसरली आणि लवकरच त्यांना पंजाबचे सिंह आणि पंजाब केसरी या नावाने ओळखले जाऊ लागले . सायमन कमिशनच्या वेळी लालाजींनी सर्वोच्च बलिदान दिले.

30 ऑक्टोबर 1928 रोजी इंग्लंडमधील नामांकित वकील सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय आयोग लाहोर मध्ये दाखल झाले. त्यातील सर्व सदस्य ब्रिटिश होते. या आयोगाचा संपूर्ण भारतभर विरोधही केला जात होता. लाहोरमध्येही असेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. लाहोर महानगर बंद होते, सर्वत्र काळे झेंडे दिसु लागले आणि ‘सायमन कमिशन गो बॅक, इंकलाब जिंदाबाद’ च्या गगणभेदी गर्जना ऐकू ऐऊ लागल्या. पंजाब केसरी लाला लाजपत राय यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तरूण , म्हातारे आणि स्त्रीया स्टेशनच्या दिशेने जात होते . ब्रिटिशांच्या दृष्टीने ही देशभक्ती म्हणजे अपराध होता.

सायमन कमिशनला विरोध दर्शविताना त्यांनी ‘ अंग्रेजो वापस जाओ ‘ अशा घोषणा देत कमिशनला कडाडून विरोध केला. त्याला उत्तर म्हणून ब्रिटीशांनी लाठीचार्ज केला. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी सांगितले की त्याच्या शरीरावर पडलेली प्रत्येक काठी ब्रिटिश साम्राज्यास संपवन्यास कफन सिद्ध होईल. इंग्रजी साम्राज्याशी लढाई करतांना लाला लाजपत राय यांनी आपले आयुष्य पनाला लावले.  आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हणाले, ‘माझ्या शरीरावर होणारी प्रत्येक जखम म्हणजे ब्रिटीश साम्राज्य संपवन्यास कारणीभुत ठरेल आणि या जखमेतुन वाहणार्या रक्ताने अनेक उधमसिंह आणि भगतसिंग तयार होतील. ज्यांच्या प्रयत्नांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळेल.

पोलिसांच्या मारलेल्या काठीने झालेल्या जखमांमुळे 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा मृत्यू झाला. लाला लाजपत राय यांच्या रूपाने देशाने एक नेता गमावला होता .जो केवळ तरुणांना संघटित करण्यात पटाईत नव्हता तर त्यांच्याकडून देशाचे काम करून घेण्याचे गुण देखील होते..

शांतता आणि सामर्थ्य या दोहोंमधून काम कसे काढायचे हे त्यांना माहित होते. त्यांचे बलिदान वाया गेले नाही किंवा त्यांचे मारेकरी जास्त काळ जगले नाही. त्यांच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्स ला राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांनी गोळ्या घालून ठार केले.लालाजींच्या प्रत्येक पावलावर त्यांच्या सोबत असणार्या भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावन्यात आली.
देशाचे हिरे देशासाठी हसत हसत फासावर चढले.  देशासाठी समर्पन करणार्या सर्व विरांना सलाम …पंजाब केसरी लाला लजपत राय यांना शतशः नमन!!

Just remember the sacrifice Sher A Punjab… Punjab Kesari Lala Lajpat Rai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती