बाम लावल्यानं डोकेदुखी कशी थांबते?


डोकेदुखी ही सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली एक व्याधी आहे. डोकं दुखत म्हणजे डोके आणि मान यांच्यातल्या स्नायूंमध्ये वेदना उमटतात आणि मज्जातंतूकरवी आपल्याला त्या जाणवतात. मेंदूवरचं आवरण ज्याला मेनिन्जेस म्हणतात त्यांच्यामध्येही वेदना होऊ शकतात. अर्थात डोकेदुखी हा थोडा सर्वसमावेशक शब्द झाला. डोकेदुखी काही वेळा रोगजंतूंच्या उपसर्गामूळे उद्धवु शकते. त्यामुळे ताप आलेला असल्यास, डोक्याच्या आसपास कर्करोगाची गाठ आलेली असल्यास, दात दुखत असल्यासही डोकेदुखी होऊ शकते. अशा काही कारणांमुळे जर डोकेदुखी उद्भवलेली असेल तर बाम लावल्यानं ती थांबण्याची शक्यता फारच कमी असते. पण या प्राथमिक कारणांशिवाय डोकेदुखी उद्भवलेली असेल तर तिचे तीन प्रकार होतात. पहिला प्रकार मायग्रेन या नावाने ओळखला जातो. काही कारणांनी मेंदूच्या सेरेब्रल कॉर्टेक्स या भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात काही घट झाली तर त्यामुळे हा प्रकार उद्भवतो. जोवर तो रक्तपुरवठा पूर्ववत होत नाही तोवर ती डोकेदुखी थांबत नाही आणि तो रक्ताचा पुरवठा औषधोपचाराशिवाय पूर्ववत होण्याची शक्यता कमी असते. How does applying balm stop headaches?

दुसरा प्रकार तणावापोटी उद्भवणाऱ्या डोकेदुखीचा. डोक्याच्या किंवा मानेच्या स्नायूंमध्ये ताण आल्यामुळे हा प्रकार उद्भवतो. काही वेळा डोळ्यांवर ताण पडल्यामुळेही अशा प्रकारची डोकेदुखी उमटू शकते. ही वेदना डोक्याच्या सर्व बाजूंना जाणवते. तिसरा प्रकार अर्धशिशीचा. यात डोक्याच्या एका बाजूलाच वेदना होतात आणि त्याचा केंद्र डोळ्यांच्या मध्यभागी असल्यासारखं वाटतं. यापैकी तणावामुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीवर बाम लावण्याचा उपाय कामी येतो. बाम चोळल्यानं एक तर त्या भागात उष्णता निर्माण होते. ती उष्णता त्या ताणलेल्या स्नायूंना परत पूर्ववत होण्यास मदत करते. शिवाय बाम चोळताना त्या स्नायूंचे धागेही चाळवले जातात. त्यामुळेही त्याच्यावरचा ताण कमी व्हायला मदत होते. चोळलेला बाम कातडीतून झिरपून तिथल्या स्नायूंमध्ये शिरतो आणि त्यामुळे स्नायूंच्या धाग्यांना अधिक उष्णता मिळून त्यांच्यावरचा ताण नाहीसा होण्यास मदत होते. स्नायू ताणलेल्या स्थितीत राहिल्यामुळे जी वेदना होते ती त्या स्नायू वरचा ताण कमी झाल्यावर नाहीशी होते.

How does applying balm stop headaches?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात