लाईफ स्किल्स : यशासाठी झपाटलेपण महत्वाचे, त्यातच लपले आहे यशाचे खरे गमक


खरे सांगायचे तर यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशिष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश उपजत असते. ते पालकांकडून त्यांच्या पाल्यांमध्ये अनुवंशिकतेने उतरते, असे एक मिथक आहे. पण संशोधन सांगते ते खरे नाही. एका अभ्यासात विविध क्षेत्रातील पाचशे यशस्वी लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात एकाही यशस्वी माणसाने अनुवंशिकतेचा संबंध असल्याचे स्पष्ट केले नाही. Haste is important for success, it is the key to success

यशासाठी आपल्याजवळ कामाविषयी तळमळ महत्त्वाची आहे. झपाटलेपणा आवश्यक आहे. यशस्वी माणसासाठी झपाटलेपणा ही सुरुवात आहे. महत्त्वाचे म्हणजे यशस्वी व्यक्ती जे करतात, ते त्यांना मनापासून आवडत असल्याने करतात. एकदा का त्यांना झपाटलेपण सापडले तर सुमार कामगिरी करणारा देखील असमान्य कामगिरी करू शकतो. फक्त त्याला ते सापडणं महत्त्वाचं आहे.

आपली आवड शोधताना सुरुवातीला त्रास होतो. कारण आपली आवड कशात आहे, हे कधी कधी अणि कुणाकुणाला सापडतच नाही. त्यामुळे ते आवड शोधण्यासाठी अनेक वाटा धुंडाळतात. आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकतात. महत्त्वाचे म्हणजे इथे आपल्या खिशातल्या पैशाचे ऐकायचे नाही. आपल्या मनाचे ऐकायला हवे. माणूस पैशांसाठी सर्व काही करत असतो, पण आवडीसाठी काम करायला लागला तर पैसादेखील आपोआप येतो. यशस्वी माणसे ही कामाला अधिक महत्त्व देतात. जीव तोडून मेहनत घेतात. मेहनत हेच यशस्वी व्यक्तींमधले समान असलेले दुसरे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. यशस्वी लोक खूप कष्टाळू असतात. सतत काम करीत राहतात. दुसरे कुणीतरी तुमचे काम करेल, यावर ते विश्वास ठेवत नाहीत.

Haste is important for success, it is the key to success

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात