विज्ञानाची गुपिते : एका वारुळात राहतात पाच लाख मुंग्या


आपल्याला रोज घरात, बागेत कोठेही छोटासा जीव इकडून तिकडे पळताना दिसतो. त्याचे नाव मुंगी. या मुंगीचे विश्वही फार अनोखे आहे. पण आपणास मुंग्याबाबत फारशी माहिती नसते. जगातील अनेक संशोक मुंग्यावर अभ्यास करीत आहेत. Five lakh ants live in a swarm

मुंग्या जमिनीत वारुळे करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त पाच लाख मुंग्या असतात. त्याच्यात श्रमविभाजन दिसून येते. तसेच एका वसाहतीत चार प्रकारच्या मुंग्या आढळतात कामकरी मुंग्या, शिपाई मुंग्या, मादी अगर राणी मुंग्या व नर मुंग्या. कामकरी मुंग्या या आकारमानाने लहान व बिनपंखाच्या असतात. त्यांचे डोळे बारीक असतात. त्या सगळ्या माद्या असल्यातरी अंडी घालू शकत नाहीत. त्यांचे काम वारुळे स्वच्छ ठेवणे, वसाहतीमधले बांधकाम करणे, अन्न गोळा करणे व परिचारिकांप्रमाणे पिलांचे संगोपन करणे हे होय.

शिपाई मुंग्याहा कामकरी मुंग्याचाच एक प्रकार आहे. या आकारमानाने थोड्या मोठ्या असून त्यांचे डोके बरेच मोठे असते. जबडे मजबूत व तीक्ष्ण असतात. यांचे काम वसाहतीतील इतर मुंग्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे हे होय. मादी अगर राणी मुंग्याया आकारमानाने बऱ्याच मोठ्या व पंखयुक्त असून यांचे काम फक्त अंडी घालणे व नवीन वसाहती स्थापन करणे हे असते.

नर मुंग्याया मादी मुंगीपेक्षा आकारमानाने लहान व नाजूक पंख असलेल्या मुंग्या असून त्या फक्त नवनिर्मीतीसाठी असतात. मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा व विटकरी असतो. तिच्या शरीराची लांबी एक मिली मीटर ते ४० मिली मीटर पर्यंत असू शकते. तिचे शरीर गुळगुळीत असून त्याचे डोके, छाती व उदर असे तीन भाग पडतात. डोके गोल अगर लांबट असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक असतात.

मिशांच्या एकूण भागांची संख्या बारकाईने पाहिल्यास ४ ते १३ असते. मिशांचा उपयोग स्पर्शज्ञानासाठी होतो. डोक्यावर तीन साधे व दोन संयुक्त पैलूदार डोळे असतात. प्रत्येक संयुक्त डोळ्यास शेकडो नेत्रिका असतात. त्यांची संख्या नियमित नसते. मोठ्या आकारमानाच्या मुंग्यांना डोळ्यात जास्त पैलू असतात, तर लहान आकारमानाच्या मुंग्यांना कमी असतात

Five lakh ants live in a swarm

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात