जुन्या जमानतली बुद्रूक सासू… आणि काँग्रेसचे बोफोर्सी argument…!!


कोरोनाचा “इंडियन स्ट्रेन” काय किंवा “कोरोना” मोदींसाठी “बोफोर्स” ठरेल, हे argument काय… काँग्रेसचा नॅरेटिव्ह सेट करण्यातला तो एक भाग मानला पाहिजे. आता काँग्रेसचा प्रभाव पहिल्यासारखा निर्माण होणार नाही, हे पुरते उमगल्याने जुन्या जमानतल्या बुद्रूक सासूप्रमाणे काँग्रेस नेत्यांची ही arguments पसरवणे सुरू आहे. congress narative setting, first indian strain and now corona will be bofors for Modi argues jairam ramesh


जुन्या जमानातल्या बुद्रुक सासूसारखा आता काँग्रेसचा स्वभाव बनला आहे. त्या सासूचे कसे असते, सूनेचा घरातला प्रभाव दिवसेंदिवस वाढत असतो. सासूचा प्रभाव घटत असतो. शिवाय वय होत चालल्याने सासूला पुन्हा पहिल्यासारखा आपला प्रभाव घरात निर्माण करता येत नाही आणि बराच प्रयत्न करून तसा प्रभाव पुन्हा निर्माण करता आलाच तर तो पहिल्यासारखा दीर्घकाळ टिकणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर जुनी बुद्रूक सासू जशी फक्त आदळ आपट करत घरात दिवस ढकलत राहते, तसेच देशातल्या काँग्रेसचे झाले आहे.

काँग्रेसचे खरेच आता वय झाले आहे. तिचा प्रभाव पूर्वीसारखा आता कधी निर्माण होणार नाही. तिची जागा केव्हाच देशपातळीवर भाजपने आणि राज्यांच्या पातळ्यांवर प्रादेशिक पक्षांनी घेतली आहे. पण जुन्या बुद्रूक सासूप्रमाणे काँग्रेसला आणि त्या पक्षाच्या नेत्यांना हे पटवून घेता येत नाहीए. पटले तरी पचवता येत नाहीए. त्यातून मग मोदींच्या बदनामीपासून देशाच्या बदनामीच्या मोहीमांची टूम काँग्रेस नेते काढत बसतात आणि मध्येच फसून जातात.

सध्या देखील काँग्रेसचे नेते दोन – तीन नॅरेटिव्ह सेट करताना दिसत होते. कोरोनाचा “इंडियन स्ट्रेन” हा त्यापैकीच एक नॅरेटिव्ह होता. पण काँग्रेसचे टूलकिट एक्स्पोज झाले आणि सगळे मूसळ केरात गेले. राहुल गांधींसकट सगळे काँग्रेस नेते तोंडावर आपटले. सोशल मीडियापासून मेन स्ट्रीम मीडियापर्यंत काँग्रेस नेत्यांची टूलकिटवरून छी थू झाली. एवढे होऊनही कमलनाथांनी त्याला आजच हवा दिली.



वास्तविक पाहता मेन स्ट्रीम मीडिया सध्या मोदींच्या विरोधात जे हत्यार सापडेल ते पाजळून त्यांच्याविरोधात लढतोय. काँग्रेससाठी ही अनुकूल स्थिती आहे. पण बुद्रूक सासूसारखे वर्तन करून काँग्रेसचे नेते मेन स्ट्रीम मीडियाची देखील पंचाइत करताना दिसत आहेत.

कोरोनाच्या “इंडियन स्ट्रेन” नॅरेटिव्हसारखाच दुसरा काँग्रेसने नॅरेटिव्ह चालवून बघितला आहे, तो तर काँग्रेससाठीच अडचणीचा ठरणारा आहे. तो सध्या ट्रेंडिंग नॅरेटिव्ह आहे. “कोरोना” म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी “बोफोर्स” ठरणार आहे. ज्या बोफोर्स प्रकरणाने राजीव गांधींची सत्ता घालविली, तशीच २०२४ मध्ये मोदींची सत्ता “कोरोना” घालविणार आहे, असे argument काँग्रेसचे बुद्धिमान नेते जयराम रमेश यांनी केले आहे. रमेश यांच्या काँग्रेसनिष्ठेविषयी आणि मोदीविरोधाविषयी शंका घ्यायचे कारण नाही.

पण त्यांनी जे argument केलेय ना… ते नुसते अस्थानीच नाही, तर अर्धवटही आहे. रमेश यांनी कोरोनाचा बोफोर्स प्रकरणाशी बादरायणी संबंध जोडला आहे. आता हेच पाहा ना… बोफोर्स प्रकरणात मूळ आरोप लाचखोरीचा होता. तो थेट राजीव गांधींवर होता. त्याचा देशाचा काहीही संबंध नव्हता. कोरोना हा लाचखोरीच्या आरोपाचा विषय नाही आणि तसा आरोपही मोदींवर काँग्रेससह कोणत्याही पक्षाने केलेला नाही. तरीही कोरोना आणि बोफोर्सचा संबंध जोडला जातोय.

रमेश हुषार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आपले argument चलाखीने केले आहे. बोफोर्स विषयाचे व्यवस्थापन करण्यात जसे राजीव गांधी कमी पडले, तसे मोदी हे कोरोनाचे व्यवस्थापन करण्यात कमी पडताहेत आणि म्हणून “कोरोना” हे मोदींसाठी “बोफोर्स” सिद्ध होईल, असा रमेश यांचा दावा आहे आणि तो सोशल मीडियातून काँग्रेसजनांनी उचलून धरला आहे.

अर्थात या दाव्याचीही वस्तुनिष्ठ चिकित्सा करता येईल. येथे अनावश्यक मोदींचे समर्थन करण्याचा किंवा त्यांनी चूका केल्या असतील, तर त्यावर पांघरूण घालण्याचा प्रश्न नाही. पण जर तशी वस्तुस्थितीच नसेल, तर रमेश यांचा दावा जसाच्या तसा स्वीकारायचेही कारण नाही.

राजीव गांधी बोफोर्स प्रकरणाचे “व्यवस्थापन” करण्यात कमी पडले, असे रमेश यांनी म्हटले आहे, म्हणजे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे…?? राजीव गांधींनी आधी लाचच घ्यायला नको होती की लाच घेतली तरी चालली असती, त्यांनी मीडिया मॅनेज करून बोफोर्सच्या बातम्या येऊ द्यायला नको होत्या, असे रमेश यांना म्हणायचे आहे…??, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. पण त्यांनी खुलासा केला नाही तरी राजीव गांधींवरचा त्यांचा दोषारोप कमी महत्त्वाचा किंवा कमी गुणवत्तेचा ठरत नाही.

बोफोर्स प्रकरणाविषयीच्या संशयातून राजीव गांधींना राजकीय किंमत चूकवावी लागली हे उघड आहे. पण त्यासाठी ते आणि तेवढे एकच कारण होते हे मानणे सर्वस्वी चूक आहे आणि त्यावेळच्या राजकीय वस्तुस्थितीलाही ते धरून नाही.

या बाबत रमेश यांच्या argument ला छेद देणारे एक विधान त्यावेळी वीर संघवी या पत्रकाराने इंडिया टुडेमध्ये केल्याचे मला आठवतेय. वीर संघवींनी लिहिले होते… First We felt that Rajiv Gandhi could do no wrong… but in the second half his tenure He did nothing right…!! वीर संघवींची राजीव गांधी हयात असताना केलेली ही कमेंट त्यावेळी गाजली होती.

मग “कोरोना” मोदींसाठी “बोफोर्स” ठरेल, या रमेश यांच्या argument मध्ये खरेच अर्थ उरतो काय…??, खरेतर शाब्दिक कसरतीशिवाय आणि किरकोळ साम्याशिवाय या argument मध्ये काही तथ्य नाही. पण काँग्रेसचा नॅरेटिव्ह सेट करण्यातला तो एक भाग मानला पाहिजे. याची सुरूवात रामचंद्र गुहांनी केली होती. त्याच साखळीतला लेख जयराम रमेश यांनी डेक्कन हेरल्डमध्ये लिहिला आहे. आणि तेच आर्ग्युमेंट काँग्रेसजन सोशल मीडियावर चालवताना दिसत आहेत.

congress narative setting, first indian strain and now corona will be bofors for Modi argues jairam ramesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात