भय्याजी जोशी : तरुणाईला जोडत संघविस्तार करणारा चाणक्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार करत तरणाईला संघाकडे आणणारे आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या प्रचारात सक्रिय भुमिका पार पाडणारे चाणक्य म्हणून ओळख असलेल्या भय्याजी जोशी यांचा सरकार्यवाहपदाचा एक तपासाचा प्रवास थांबला आहे. संघपरिवाराला देशात बळकट करण्यात भय्याजींची मोठी भूमिका होती. भय्याजी जोशी यांनी आखलेल्या रणनितीचा भाजपाच्या यशात मोठा वाटा आहे. Bhayyaji Joshi: Chanakya who connects the youth and expands RSS


अभिजित विश्वनाथ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार करत तरणाईला संघाकडे आणणारे आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या प्रचारात सक्रिय भुमिका पार पाडणारे चाणक्य म्हणून ओळख असलेल्या भय्याजी जोशी यांचा सरकार्यवाहपदाचा एक तपासाचा प्रवास थांबला आहे. संघपरिवाराला देशात बळकट करण्यात भय्याजींची मोठी भूमिका होती. भय्याजी जोशी यांनी आखलेल्या रणनितीचा भाजपाच्या यशात मोठा वाटा आहे.

भय्याजी जोशी यांच्या कार्यकाळात संघाचा मोठा विस्तार झाला. उत्तर प्रदेशसह ईशान्येत त्यांच्या कार्यकाळात संघकार्यात वाढ झाली. संघाच्या शाखांमध्ये ४० टक्यांनी वाढ झाली. प्रचारक ते सरकार्यवाहपद असा भय्याजींचा प्रवास राहिलेला आहे. भय्याजी जोशी हे मूळचे इंदूरचे. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्षातच १९४७ साली त्यांचा जन्म झाला. आहे. जोशी यांनी ठाणे या शहरात शिक्षण पूर्ण करत कला शाखेची पदवी संपादन केली. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या भैय्याजी जोशी यांची १९७५ साली प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी देशातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये संघविस्ताराचे काम केले.महाराष्ट्रात जिल्हा विभाग प्रचारक, प्रांत सेवा प्रमुख, क्षेत्र सेवा प्रमुख, अखिल भारतीय सहसेवा प्रमुख, अखिल भारतीय सेवा प्रमुख, सह-सरकार्यवाह अशा विविध जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. २०१२ व २०१५ सालीदेखील त्यांची एकमताने निवड झाली. विधायक सेवा कार्य करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संघटनकौशल्य, प्रशासकीय हातोटी व नियोजन यामुळे संघकायार्चा देशभरात विस्तार झाला आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या प्रचारात सक्रिय भुमिका पार पाडली होती. यात भय्याजी जोशी यांनी संपूर्ण रणनिती आखली होती . भय्याजींनी संघकायार्चा केवळ विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली.

मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत जोशी यांची सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. त्यानंतर सातत्याने त्यांची निवड झाली व १२ वर्षांत त्यांनी संघाला तरुणाईपर्यंत नेण्यात मोठी भूमिका पार पाडली. प्रकृती ठीक नसतानादेखील त्यांनी कर्तव्य बजावत संघविस्ताराचे सखोल नियोजन केले होते.

कोरोनामुळे २०२० साली संघाची अ.भा. प्रतिनिधीसभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात सरसंघचालक व भय्याजी जोशी यांनी देशभराचा प्रवास केला. कोरोनामुळे संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, यासाठी जोशी यांनी स्वत: देशातील सर्व क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय लॉकडाऊनमध्ये देशपातळीवर झालेल्या मदतकार्यातदेखील त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन झाले होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच संघ कार्यकर्त्यांनी कोरोना काळात सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला.

भय्याजी जोशी हे १२ वर्षे सलग सरकार्यवाह राहिले. तर हो. वे. शेषाद्री यांनी १३ वर्षे या पदाची सलग धुरा सांभाळली होती. शेषाद्री १९८७ साली सरकार्यवाह झाले होते व २००० सालापर्यंत ते त्या पदावर होते.

Bhayyaji Joshi: Chanakya who connects the youth and expands RSS

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*