संघ बदलला, गणवेश बदलला; टीकेची हत्यारे जुनीच!


विशेष प्रतिनिधी 

संघ बदलला गणवेश बदलला, पण टीकेची हत्यारे जुनीच!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसने आणली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी हिंदू हेट स्पीच देणारे वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरू फादर जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. त्यांच्याकडून येशू ख्रिस्त देव समजावून घेतला. Bharat Jodo yatra : Congress targets RSS to hide its minority vote poll plank

तामिळनाडू आणि केरळ मधल्या भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधींनी अनेक चर्चेस आणि मशिदी यांना भेट दिल्या. त्याचे प्रतिकूल राजकीय पडसाद उमटल्यानंतर मात्र काँग्रेसने आपल्या टीकेचे जुनेच हत्यार बाहेर काढले. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी हाफ पॅन्ट आणि तांबडा पट्टा यांचे क्लिप आर्ट टाकून त्या हाफ पँटला आग लागल्याचे दाखविण्यात आले. भारत जोडो यात्रेचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून भाजपची कशी जळती आहे, हेच यातून थेटपणे सूचित होत होते. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला प्रत्युत्तर देऊन हा विषय संपविला होता. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मात्र संघाच्या हाफ पँटचा विषय पुन्हा उकरून काढला आहे. भाजपवाले आपल्याला त्या हाफ पॅन्टशी का जोडून घेतात?? कोणीही हाफ पॅन्ट घातली की ते भाजपवाले झाले का??, असा खोचक सवाल कमलनाथ यांनी करून पुन्हा त्या विषयाला हवा दिली आहे.

 हाफ पॅन्टचा विषय काढला का??

पण या सगळ्यात एक महत्त्वाचा विषय मागे पडला आहे, तो म्हणजे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ते काँग्रेससाठी करत असलेली अल्पसंख्यांक मतांची बेगमी!! काँग्रेसच्या आणि खुद्द राहुल गांधींच्या ट्विटर हँडलवर किंवा अन्य सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केलेले फोटो पाहिले की ही बाब अधिक स्पष्ट होते. राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून महिलांशी विद्यार्थ्यांची हितगुज करताना दिसत आहेत. या सगळ्यांची नीट बॅकग्राऊंड लक्षात घेतली, तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा “नेमका मोटो” अधिक ध्यानात येईल. पण हा विषय चर्चेला आला आणि सोशल मीडियात त्याचे पडसाद उमटले तर काँग्रेसला अडचण होऊ शकते त्यामुळेच संघाची खाकी हाफ पॅन्ट हा विषय फोर फ्रंट वर आणण्यात आला. वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरू पोन्नैया यांच्या भेटीनंतर सोशल मीडियात प्रतिकूलतेची झलक काँग्रेसने अनुभवली होती. मग तो विषय मागे टाकायचा झाल्यास दुसरे काय करता येईल??, हे लक्षात घेऊनच संघाच्या खाकी हा त्यांचा जुना विषय उकरून काढला गेला!!

संघ बदलला, गणवेश बदलला

वास्तविक पाहता संघ बदलला. संघाचा गणवेश देखील बदलला. या गणवेश बदलाला देखील सहा वर्षे उलटून गेली आहेत. संघात बदलाची प्रक्रिया शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असते. पण काँग्रेस मात्र अजून स्वतःच संघाच्या जुन्या गणवेशात “गुरफटलेली” दिसत आहे. गणवेशापासून विविध राजकीय, सामाजिक धारणांमधल्या संघातल्या बदलाची पुसटशी जाणीव देखील काँग्रेस नेत्यांना झालेली दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसजन जुन्याच हत्यारांनी संघाला झोडपत आहेत. त्यांचे संघाला झोडपण्याचे आणि भाजपला डिवचण्याचे “नवतंत्र” नव्हे, तर “जुनतंत्र” अनेकांच्या लक्षात आले आहे आणि त्यातून सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट दिल्या आहेत. पण या कमेंटची काँग्रेस दखल घेणार का?? आणि घेतली तरी तिचा परिणाम काय होणार का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

 यात्रा व्यवस्थापक चाणक्य काय करतात??

पण एक मात्र निश्चित भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी करत असलेले अल्पसंख्यांक मत जोडणीचे प्रयत्न सुरुवातीलाच उघड्यावर आल्याने काँग्रेसला संघाच्या खाकी हक्कांचा जुना विषय शोधावा लागला आणि आपल्या जुन्याच हत्यारांनी संघाला टार्गेट करावे लागले. यातून काँग्रेसचे राजकीय तोकडे पण पुढे आले!! काँग्रेस मधील “यात्रा व्यवस्थापक” “चाणक्यांना” हे लक्षात येत नाही का??

Bharat Jodo yatra : Congress targets RSS to hide its minority vote poll plank

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात