स्वप्नपूर्ती चाळीस वर्षांच्या लढ्याची; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची


अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याची सर्व भारतीयांची गेल्या पाचशे वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यासाठी रक्तरंजित लढाही दिला गेला. लाखो हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने चाळीस वर्षे दिलेल्या लढ्याला भारतीय जनता पक्षाने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या भूमिपूजनाने एका स्वप्नाची पूर्ती होत आहे.


अभिजित विश्वनाथ, नवी दिल्ली.

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याची सर्व भारतीयांची गेल्या पाचशे वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यासाठी रक्तरंजित लढाही दिला गेला. लाखो हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने चाळीस वर्षे दिलेल्या लढ्याला भारतीय जनता पक्षाने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या भूमिपूजनाने एका स्वप्नाची पूर्ती होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणावर विचार केला जात होता. मात्र, संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात १९५९ मध्ये सर्वात अगोदर देशातील मंदिरांवर झालेले आक्रमण यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्राचीन मंदिरांचे समाजात सहिष्णूता कायम ठेवत पुनर्निर्माण व्हावे, अशी भूमिका यात संघाने मांडली होती. मात्र त्यावेळी अयोध्येतील राममंदिरापेक्षा काशी विश्वनाथ मंदिरावर जास्त भर होता. वेळोवेळी तत्कालीन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी सार्वजनिक मंचांवरुन राम मंदिरासंदर्भातील मुद्दा जनतेसमोर मांडला होता.

१९८३ सालापासून संघ तसेच इतर संघटनांनी देशभरात वातावरण निर्मितीला सुरुवात केली. १९८६ साली संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ३७ वर्षानंतर अयोध्येच्या राममंदिराला कुलूपातून मुक्ती मिळाल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शासनाने नवनिर्मित रामजन्मभूमी न्यासला मंदिराची जागा विकासासाठी द्यावी ही मागणी त्यावेळी करण्यात आली. १९८७ साली भव्य राममंदिर निर्मितीसाठी आवाहन करण्यात आले. १९९० साली विहिंपच्या मंदिर निर्मितीच्या संकल्पाला संघाने पाठिंबा दिला.

संघाशीच जातकुळी सांगणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम मंदिराची उभारणीचा ध्यास अगदी पहिल्यापासून घेतला. १९६४ साली साधुसंतांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या प्रेरणेने एप्रिल १९८४ रोजी झालेल्या प्रथम धर्मसंसदेने रामजन्मभूमी मुक्ततेच्या कार्याला हात घातला. ५२८ धर्माचार्यांच्या उपस्थितीत ‘रामजन्मभूमी मुक्तियज्ञ समिती’ची स्थापना झाली. राम मंदिराच्या निर्माणासाठी समाजमन तयार करण्याचे आव्हान विश्व हिंदू परिषदेने स्वीकारले.

२५ सप्टेंबर १९८४ रोजी सीतामातेच्या जन्मस्थानापासून ‘श्रीराम जानकी यात्रे’चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्तर प्रदेशपुरताच होता. ७ ऑक्टोबर १९८४ रोजी यात्रा अयोध्येत पोहोचली व दोन लाख रामभक्तांच्या उपस्थितीत मेळावा झाला. नंतरच्या काळात २६ मार्च १९८५ रोजी ‘रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ची बैठक झाली व ८ मार्च १९८६ रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत रामजन्मभूमीची कुलपे काढली नाहीत तर हिंदू आता गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. या मागणीसाठी देशभर काहीना काही कार्यक्रम झाले.

परिणामत: १ फेब्रुवारी १९८६ रोजी न्यायालयामार्फत कुलपे काढण्याचा आदेश दिला गेला. यानंतरच्या काळात विश्व हिंदू परिषदेने ‘९ नोव्हेंबर १९८९ रोजी रामजन्मभूमीवर शिलान्यासाचा’ व त्यापूर्वी देशातील सर्व गावांमध्ये श्रीरामशिला पूजनाचे कार्यक्रम केले. त्याला विरोध झाला पण सर्वोच्च न्यायालयाने शिलान्यासावर बंदी आणता येणार नाही, असा निर्णय दिला. ‘यज्ञ समितीने’ जागा निश्चित केली व २ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमासाठी शिलान्यासाच्या जागेवर चबुतरा बांधला.
धर्मसंसदेने ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत मंदिर निर्माण करण्यासाठी कारसेवा करण्याचे ठरविले. हा संदेश देशभर देण्यासाठी श्रीरामज्योती यात्रेचे आयोजन केले. प्रत्येक हिंदू बांधवाने त्या ज्योतीवरून आपल्या घरातील ज्योत प्रज्वलित करून यात्रेची सांगता करावी असा कार्यक्रम ठरविला गेला. अयोध्येत ३० ऑक्टोबरला लाठीचार्ज, गोळीबार झाला; पण कारसेवकांनी तथाकथित ‘बाबरी ढाचा’वर भगवा फडकविला.

९ जुलै १९९२ ला कारसेवा सुरू करण्याचा निर्णय धर्मसंसद व रामजन्मभूमीयज्ञ समिती अशा दोघांनी घेतला. श्रीराम चबुतरा बांधण्याचे काम सुरूही झाले; पण केंद्र सरकार न्यायालयामार्फत निर्णय मिळावा म्हणून प्रयत्नशील राहिले. पण संत महंत आक्रमक झाले होते. ६ डिसेंबरला अयोध्येत जमलेल्या रामभक्त कारसेवक शेवटी रामजन्मभूमीस्थानी एकत्र झाले व तथाकथित ‘बाबरी ढाचा’ जमीनदोस्त झाला. आतील रामलल्ला मूर्तीसाठी एक छोटे मंदिरही निर्माण झाले. नंतरचा लढा हा न्यायालयीन होता, राजकीय होता. २७/२८ वर्षांनी दोन्ही स्तरावर तो जिंकला गेला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती