घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या माना सोडविण्यासाठी पवार भाजपकडे गेले पण…!! मोदी – शहांनी ऐकले नाही…!!


  • फडणवीसांच्या मुलाखतीतले खरे between the lines; पण मीडियाने पवार narrative चालवताना केले दुर्लक्ष
  • शिवसेनेला बरोबर ठेवण्याचा मोदींचा आग्रह होता

विनायक ढेरे

देवेंद्र फडणवीसांची “इनसायडर” मुलाखत झाल्यानंतरही त्याचे राजकीय लळित अजून सुरूच आहे. उलट त्या मुलाखतीतून नवनवे खुलासे बाहेर येत आहेत. “पवारांना फडणवीस नको होते.”, “त्यावेळी “शिवसेनेबरोबर सत्तेत बसण्याची पवारांची तयारी नव्हती”, “राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेत आली असती तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी थांबविणार नाही हे शरद पवारांना भाजपने स्पष्ट सांगितले होते”, हे ते खुलासे…!! मीडियाने दिलेल्या बातम्या आणि केलेल्या विश्लेषणातून हे अत्यंत महत्त्वाचे दुवे निसटले आहेत. किंवा मीडियाने पवार narrative चालवताना हेतूपूर्वक या दुव्यांमधील “मुद्यांकडे” दुर्लक्ष केले आहे.

वर उल्लेख केलेल्या प्रत्येक दुव्यामधून भाजपने राष्ट्रवादीशी तडजोड केली असती तरी भाजपचा upper hand कायम राहिला असता आणि इथेच पवारांच्या नकाराची मेख दडल्याचे फडणवीसांनी उलगडून सांगितले आहे.

सिंचन घोटाळ्यापासून राज्य सहकारी बँक घोटाळ्यापर्यंत अनेक घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अडकले आहेत. आजही पवार त्यांची त्यातून सुटका करू शकलेले नाहीत. त्यावेळी तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार होते. प्रशासनावर पूर्ण grip बसली होती. पवारांना विविध घोटाळ्यांमधून राष्ट्रवादीच्या नेत्यांची मान सोडवायची होती. म्हणूनच भाजपशी तडजोड करण्याशिवाय पवारांना पर्याय नव्हता. यातूनच तडजोडीसाठी ते तयार झाले आणि भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाठवला होता.

मात्र राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली तरी घोटाळ्यांची चौकशी थांबविणार नसल्याचे पवारांना थेट सांगण्यात आल्याने पवारांनी निर्णय फिरवल्याचे फडणवीसांच्यात वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. ही झाली, २०१७ ते २०१९ पर्यंतची story.

आता २०१९ नंतरची story, राज्यात २०१९ मध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवार यांनीच पुन्हा अमित शहांकडे प्रस्ताव देऊन चर्चा केली होती. पण नंतर निर्णय फिरविला. शरद पवारांनी निर्णय फिरवल्याचे अजित पवारांना पटले नाही. अजित पवारांनी स्वतंत्रपणे पुन्हा आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दाखविल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन आमचा शपथविधी झाला, असा खुलासा फडणवीसांनीच मुलाखतीत केला आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे २८ आमदार अजित पवारांबरोबर खात्रीने होते, असे सांगण्यात येते. आकडा जास्तच होईल कमी नाही, याचीही सूत्रे खात्री देत होते. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला.

“त्यावेळी अनेकांनी पाठीत खंजीर खुपसल्याने राजकारणात टिकून राहण्यासाठी गनिमी कावा करावा लागला. त्यावेळी तो निर्णय मला पूर्णपणे पटला होता. पण आता त्याचा विचार करताना किंवा मागे वळून पाहताना तसे केले नसते,” तर बरे झाले असते,” अशी राजकारणात खंत फडणवीसांनी बोलून दाखवली. पक्के मुरलेले राजकारणी सत्य सांगत नसतात. खंत बोलून दाखवत नसतात. खोटे रेटून बोलतात. मात्र, मोदी – शहांनी दाखविलेल्या अतूट विश्वासातून फडणवीसांनी सत्य सांगितलंय…!!

शरद पवार यांच्याच दोन वर्षांपूर्वीच्या भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्तावात फक्त राष्ट्रवादीला स्थान होते. शिवसेनेला स्थान नव्हते. परंतु, शिवसेनेला बरोबर घेऊनच राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होता येईल, अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली होती. त्यावेळी मात्र शिवसेनेला बरोबर ठेवून सत्तेत सहभागी होण्याची पवारांची तयारी नव्हती. पण मोदी बधलेले दिसत नाहीत. शिवसेनेला सोबत ठेवण्याचा आग्रह मोदी यांनी कायम ठेवला. नाहीतर तेव्हाच भाजपबरोबर राष्ट्रवादीचे सरकार आले असते. याकडे फडणवीस यांनी मुलाखतीतून लक्ष वेधले. पण माध्यमांनी त्याकडे सोयिस्कर “दुर्लक्ष” केले.

शरद पवार यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाबाबत तपशील उलगडून सांगताना फडणवीस यांनी एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली ती म्हणजे, २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड विजय मिळाल्यावर देशात भाजपची ताकद वाढल्याची जाणीव पवारांना झाली. भाजपचा political clout वाढल्यावर महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी विरोधात आक्रमक होईल हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मवाळ भूमिका घेऊन पवार यांनी अमित शहांकडे भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यावेळी शिवसेना सत्तेत असूनही सातत्याने भाजप नेतृत्वावर टीका करीत होती, युतीत शिवसेना सडली, अशी वक्तव्ये उद्धव ठाकरे यांनी केली होती. तरीही पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनेला बरोबर ठेऊनच सत्तेत सहभागी होता येईल, असे सांगितले होते. ते पवारांना मान्य केले नाही. कारण सत्तेतला वाटा मिळाला असता तरी तो कमीच मिळाला असता आणि शिवाय घोटाळ्यांच्या आरोपातून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडकलेल्या मानाही सुटल्या नसत्या. दोन्ही बाजूंनी भाजपशी सौदा घाट्याचा ठरत होता. म्हणून पवारांना स्वत:च प्रस्ताव देऊनही माघार घेणे भाग पडले.

शिवसेनेशी २०१९ मध्येही मुख्यमंत्री पदावरून बोलणी फिसकटली. अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले नसतानाही उद्धव ठाकरे असे वागले. त्यावेळीही शरद पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देऊन शहा यांच्याशी चर्चा केली होती. फडणवीसांची अजित पवारांशी चर्चा झाली होती. शिवसेनेशी जुळणार नाही, हे लक्षात आल्यावर भाजपने राष्ट्रवादी काँगेसशी चर्चा केली होती. पण शरद पवार यांनी निर्णय फिरविला. फडणवीसांनी आठ-नऊ दिवस वाट पाहिली. शरद पवारांचा निर्णय अजित पवारांना पटला नाही. तीन पक्षांचे सरकार चालविणे राज्यहिताच्या दृष्टीने योग्य अजित पवारांना योग्य वाटले नाही. त्यांनी भाजपला पुन्हा निरोप पाठवून आपल्या बरोबर आमदार असल्याचे सांगितले होते. अमित शहांशी चर्चा झाली. सारेकाही रात्रीत ठरले आणि सकाळी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन शपथविधी झाला. अमित शहांचा याला पाठिंबा होता.

या मागचे सगळे नाट्य फडणवीसांनी उलगडून दाखविले पण माध्यमांनी पवार narrative चालवताना फडणवीसांच्या मुलाखतीतून selective उचलले. हे खरे फडणवीसांच्या मुलाखतीचे लळित आहे…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था