कॉंग्रेसने लपविली हंडरसन-भगत रिपोर्टमधील नेहरूंच्या अपयशाची कहाणी


चीनसोबत १९६२ साली युध्दात झालेल्या भारताचा अपमानजनक पराभव झाल्यानंतर त्याची कारणमिंमासा करणारा हंडरसन-भगत रिपोर्ट कॉंग्रेसने तब्बल साठ वर्षे लपविला. एवढेच नाही तर लष्कराने भारत-चीन सीमा संरक्षणाबद्दल १९५९ च्या पूर्वी केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव पाठविले होते. जनरल थिमय्या, थोरात व कलवतसिंग या सैनिकी अधिकाऱ्यांनी हिमालयाच्या संरक्षण योजना तयार केल्या होत्या तथापि अशा काही उपाययोजना केल्यास चीनला डिवचल्यासारखे होईल, म्हणून नेहरूंनी त्या योजनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भारतीय लष्कर सक्षम होण्यात पहिल्यापासूनच अडचणी आल्या.


अभिजित विश्वनाथ, नवी दिल्ली

चीनसोबत १९६२ साली युध्दात झालेल्या भारताचा अपमानजनक पराभव झाल्यानंतर त्याची कारणमिंमासा करणारा हंडरसन-भगत रिपोर्ट कॉंग्रेसने तब्बल साठ वर्षे लपविला. एवढेच नाही तर लष्कराने भारत-चीन सीमासंरक्षणाबद्दल १९५९ च्या पूर्वी केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव पाठविले होते. जनरल थिमय्या, थोरात व कलवतसिंग या सैनिकी अधिकाऱ्यांनी हिमालयाच्या संरक्षणयोजना तयार केल्या होत्या तथापि अशा काही उपाययोजना केल्यास चीनला डिवचल्यासारखे होईल, म्हणून नेहरूंनी त्या योजनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भारतीय लष्कर सक्षम होण्यात पहिल्यापासूनच अडचणी आल्या.

१९६२ मध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर तत्कालिन मेजर जनरल हंडरसन ब्रुक्स आणि ब्रिगेडियर प्रेमसिंग भगत यांची समिती नेमण्यात आली. पराभवाची कारणे शोधण्याचे काम या समितीकडे देण्यात आले होते. परंतु, पंडीत नेहरू यांनी या समितीचा अहवाल कधीही स्वीकारला नाही. एवढेच नव्हे तर त्यानंतर आलेल्या कोणत्याही कॉंग्रेस सरकारनेही हा अहवाल सार्वजनिक केला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या अहवालात पराभवासाठी राजकीय नेतृत्व म्हणून पंतप्रधान पंडीत नेहरू यांना जबाबदार धरण्यात आले होते.

हा अहवाल सार्वजनिक व्हावा यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, संवेदनशिल अहवाल असल्याचे कारण सांगून कॉंग्रेसच्या सरकारने ते नाकारले. २००८ मध्येही लोकसभेत तत्कािलन संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांनी हा अहवाल खुला करण्यास नकार दिला होता. एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने या अहवालातील काही गोष्टींचा शोध घेण्यात यश मिळविले. त्यानुसार १९६२ मध्ये भारतीय सैैन्याकडे अत्याधुनिक हत्यारच नव्हे तर जेवणाची आणि थंड हवामानात लढण्यासाठी गरम कपड्यांचीही कमतरता होती. चीनला ही गोष्ट पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्यांनी हल्ला करण्याचे धाडस केले.

धक्कादायक गोष्ट म्हणजे १९६० मध्ये तिबेटमधून दलाई लामा यांच्यासोबत हजारो शरणार्थी आले होते. त्यातील अनेक जण चीनने पेरलेले गुप्तहेर होते. ते चीनसाठी हेरगिरी करत होते. त्यामुळे भारतीय सैैन्याची पूर्ण माहिती त्यांना मिळत होती. नेफा भागात भारताने ऑपरेशन ओंकार लॉंच केले. तत्कालिन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन आणि नेहरूंचे जवळचे नातेवाईक असलेले लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांच्या डोक्यातून ही कल्पना होती. परंतु, अनेक ठिकाणी चुकीच्या जागी सैनिक चौक्या उभारण्यात आल्या. त्यामुळे चीनी सैन्याचा प्रतिकार करता आला नाही.

१९६१ मध्येच चीनने सिक्यांग-तिबेट रस्त्यावर ७० मैल पुढे आला होता. भारताचा तब्बल १४ हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश बळकावला होता. यावर टीका झाल्यावर मग नेहरूंनी लष्कराला चीनला मागे ढकलण्याचा आदेश दिला. मात्र, त्यासाठी सैनिकांना आवश्यक साधनसामुग्री पुरविली नाही. तत्कालिन लष्कर प्रमुख पी. एन. थापर सातत्याने हत्यारे आणि इतर साधनांची मागणी करत होते. परंतु, नेहरूंनी त्याकडे लक्ष दिले नाही.

हे सगळे होत असताना भारतातील वरिष्ठ सैैनिक अधिकारी सातत्याने चीनपासून धोक्याचा इशारा देत होते. भारत-चीन सीमासंरक्षणाबद्दल १९५९ च्या पूर्वी केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव पाठविले होते. जनरल थिमय्या, लेफ्टनंट जनरल थोरात व कलवतसिंग या अधिकाऱ्यांनी हिमालयाचे संरक्षण करण्यासाठी योजना तयार केल्या होत्या. मात्र, पंडीत नेहरूंनी त्याला मान्यता दिली नाही. त्याचे कारण म्हणजे या योजन राबविल्या तर चीनला डिवचण्यासारखे होईल. कोरियात चीनने वापरलेल्या युद्धतंत्राच्या अभ्यासावरून भारतीय सेनेच्या शिक्षणासाठी सेनाधिकारी प्रेमसिंग भगत यांचे चांडाल आर्मी हे पुस्तक तयार करण्यात आले होते. मात्र, हे पुस्तक भारतीय सैनिकी अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले. चीनबरोबरील संबंध बिघडू नयेत म्हणून राजकीय, शासकीय व पोलिसी कार्यवाही व्यतिरिक्त दुसरी कोणतीही विशेषत: सैनिकी कृती करण्यात आली नाही.

खड्या सैन्याचा वापर सीमेवर करण्याचे टाळण्यात आले. मात्र, अगदी १९६० पासूनच चीनच्या कुरापती सुरू होत्या. अक्साई चीन भागात चीनने रस्त्याची बांधणी केली होती. चुकीचे नकाशे प्रसिध्द केले होते. परंतु, नेहरू सातत्याने चीनला चुचकारत होते. त्यामुळे भारताने कोणत्याही प्रकारची तयारी केली नाही. एवढेच नव्हे मानहानीकारक पराभवानंतरही हंडरसन-भगत समितीचा अहवाल बासनात टाकण्यात आला. नेहरूंच्या धोरणावर या अहवालात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असले तरी भारतीय सैन्याने चीनसोबतच्या संघर्षात सज्ज राहावे यासाठी अनेक उपाययोजनाही सुचविल्या होत्या. मात्र, त्या केल्या गेल्या नाहीत.

त्यामुळे चीनच्या युध्दतंत्रापेक्षा तब्बल पन्नास वर्षे भारत मागे राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर उपाययोजना सुरू झाल्या. चीनच्या सीमावर्ती भागात पक्के रस्ते बनविण्यात आले. सैैनिकांना आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यात येऊ लागली. त्यामुळेच चीन आता चिडला असून भारताविरुध्द कुरापती काढत आहे. कॉंग्रेसने हंडरसन-भगत रिपोर्ट लपविला नसता आणि त्याच्या शिफारसी मानल्या असत्या तर भारतीय बहादूर भारतीय सैन्य आणखी बलवान झाले असते. पन्नास वर्षांची सगळी तयारी सहा वर्षांतच करण्याची वेळ आता आली नसती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था