काँग्रेस आणि डाव्यांच्या वैचारिक आत्मघातकी पथकाशी मोदींचा मुकाबला


चीनशी संघर्ष सुरू असताना़ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातल्या वैचारिक आत्मघातकी पथकाला सामोरे जावे लागत आहे. हे पथक चीनधार्जिणी arguments करून मोदींबरोबरच भारतीय हितसंबंधांना अडथळा आणत आहे.


विनायक ढेरे

नरेंद्र मोदी नावाची प्रवृत्ती सत्तेवर अाल्यापासून राज्यकर्त्या वर्गातील political elite class मधील एक वर्ग दुखावला गेलाय. हा वर्ग नुसता भावनिक पातळीवर दुखावलाय असे नाही, तर त्याच्या वर्षानुवर्षे जोपासलेल्या हितसंबंधांना आणि नेटवर्कला मूळापासून हादरा बसलाय. यातून टप्प्याटप्प्याने हा वर्ग मोदींच्या राजकीय विरोधकापासून ते वैचारिक आत्मघातकी पथकाच्या अवस्थेपर्यंत येऊन ठेपला आहे. मोदींनी त्यांच्याबद्दल, “उन्हे पता ही नही चला की वह मेरा विरोध करते करते देश का विरोध कब करने लगे,” असे म्हटलेय.

दहशतवादी तयार केले जातात. त्याची एक प्रक्रिया असते. एकानंतर दुसरे अवघड होत जाणारे टप्पे असतात. ते प्रत्येक व्यक्तीला पार करावे लागतात. जो सगळे टप्पे यशस्वीपणे पार करतो त्यालाच आत्मघातकी पथकामध्ये स्थान दिले जाते. हे पथक सर्वांत खतरनाक मानले जाते. कारण ते target complete करताना आत्मनाश ओढवून घेत असते.

दुर्दैवाने हे म्हणावे लागतेय, की सध्याचे काँग्रेस नेते (काही अपवाद वगळून) आणि डावे नेते गेल्या काही वर्षांमध्ये अशाच प्रक्रियेतून पार पडून आले आहेत. सत्ता आणि सत्तेचे राजकीय, आर्थिक, सामाजिक लाभ त्यांच्या हातातून टप्प्याटप्प्याने निसटत गेले तसतसे हे नेते आणि त्यांचा वर्ग वैचारिक आत्मघातकी पथकापर्यंतचे टप्पे समांतर पातळीवर पार करून पुढे आला. आणि आता तो आत्मनाशापर्यंत येऊन पोहोचला आहे. या आत्मनाशाची त्याला पुरती जाणीव झाली आहे त्यामुळे त्याने, “संपू तर मोदींना घेऊन संपू. नाही तर देशाला घेऊन संपू,” अशी स्वत:ची धारणा करून घेतलीय.

मोदी विरोधाची ही सुरवात २००२ पासून झाली असली तरी त्याने निर्णायक टप्पा गाठला तो २०१४ ते २०१९ या कालावधीत. पाच वर्षांमध्ये मोदींनी या वर्गाचे आणि नेत्यांचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावर दुखावून ठेवले. मोदी विरोधकांचे हे दुखणे पाच वर्षांपर्यंत मर्यादित राहिले असते तर काही “बिघडण्याचे” कारण नव्हते. पण मोदी प्रवृत्ती २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आली आणि या दुखावलेल्या वर्गातून वैचारिक आत्मघातकी पथके तयार झाली. यांना वैचारिक आत्मघातकी पथके म्हणण्याचे कारण ते जी arguments करतात, जे perspectives मांडतात आणि जे narratives तयार करतात, ते सगळे परधार्जिणे विशेषत: पाकिस्तान आणि चीन धार्जिणे असतात. पी. चिदंबरम यांनी काय म्हटलंय, भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला तरी चीनला फरक पडणार नाही. नुकसान भारतीयांचेच होईल. चिनी ग्लोबल टाइम्स तरी दुसरे काय म्हणतोय? चिनी वस्तूंवर बहिष्काराने भारताचेच नुकसान होईल, हेच तर argument आहे, ग्लोबल टाइम्सचे. त्याला चिदंबरम पुष्टी देताहेत. याला आत्मघातकीपणा नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणायचे? (तरी बरं अजून मणिशंकर अय्यर काही बोललेले नाहीत.)

मोदींच्या आर्थिक आणि संरक्षण धोरणावर चिदंबरम व अन्य नेत्यांनी टीका केली आहे. ही टीका भारतीय context मध्ये असती तर स्वीकारायलाही हरकत नाही. पण मेक इन इंडियापासून ते चिनी वस्तूंवर बहिष्कारापर्यंत त्यांची सर्व arguments चीनलाच धार्जिणी ठरत आली आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर भारत – चीन व्यापाराचे देता येईल. आज जगातली बहुसंख्य consumer products चिनी आहेत. चीन “कोरोनापूर्व जगाचे” manufacturing hub आहे. ३० वर्षांची चीनची यात मेहनत आहे. चीनशी व्यापारात भारताची तूट ५४% आहे. ही आकडेवारी नवीन नाही. चीनची सैनिकी ताकद, जागतिक प्रभावही कमी नाही. हे वास्तव मोदीही नाकारत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही, ना की चीन अजिबात infallible नाही. चीनशी कोणी, कशाचीच स्पर्धा करू शकत नाही. की स्पर्धेचा विचारही करू शकत नाही. उलट चीनशी संघर्ष सोपा नाही, पण अशक्यही नाही असे मोदी मानतात. तशी दीर्घकालीन तयारी करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतात.

ही महत्त्वाकांक्षाच वैचारिक आत्मघातकी पथकाला मान्य नाही. या पथकातील नेत्यांचे वैशिष्ट्य असे की चीनच्या सर्व प्रकारच्या ताकदीचा ते असा बागूलबुवा उभा करून ठेवताहेत की भारताने मान वर करून त्याच्याकडे पाहता कामा नये. चीनच्या व्यापारी आकडेवारीची भीती दाखवून ही तूट कमी होणे कसे शक्य नाही, हेच सांगत बसातात. भारताने तूट कमी करण्यासाठी पावले उचलली तर चीन त्यात कसे अडथळे आणेल, भारताचा सैनिकी, व्यापारी, आर्थिक कसा तोटा होईल? भारताला त्याची किती मोठी किंमत मोजावी लागेल? याची arguments करतात. थोडक्यात अडथळ्यांचा आणि समस्यांचा असा चक्रव्यूह मांडून ठेवतात की भारत यातून कधी बाहेरच पडू शकणार नाही, चीनला compete करू शकणार नाही याची वैचारिक मांडणी करतात.

सोनिया गांधी, राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड, हुसेन दलवाई, डाव्या पक्षांचे नेते डी. राजा, प्रशांत किशोर, कन्हैया कुमार यांनी मोदींच्या चीन संघर्षावरील वक्तव्यावर कशी आणि कोणती arguments केली आहेत? यातले between the lines वाचल्यावर वैचारिक आत्मघातकी पथकाचे मनसूबे आणखी तपशीलवार लक्षात येतात. सीमेवर कोण कसे गेले? कसे मारले गेल? सीमेवर लाठ्या घेऊन संघ स्वयंसेवकांना पाठवा, आपल्या सैनिकांच्या हातात शस्त्रेच कशी नव्हती? घरात घुसून मारू म्हणणारा घुसखोरीच झाली नाही, असे म्हणतोय… मोदींना असले प्रश्न विचारून आणि असभ्य विधाने करून प्रत्यक्ष भारतीय सैन्याला आणि पर्यायाने भारताला या वैचारिक आत्मघातकी पथकाने घेरण्याचा प्रयत्न केलाय, असे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे…!!

मूळात हे प्रश्न किंवा विधाने म्हणजे मोदींवर आघात कमी आणि भारताच्या हितावर आघात जास्त अशी स्थिती आहे… आणि हे त्यांनी का केलयं तर मोदींनी त्यांचे हितसंबंध कायमचे दुखावून ठेवलेयत म्हणून. या सगळ्यांना मोदींनी नुसतेच राजकीय बेरोजगार करून ठेवले असते तर कदाचित त्यांचेही काही म्हणणे नसते. कारण राजकीय बेरोजगारी पाच – दहा वर्षांमध्ये संपते. पुन्हा सत्तेवर येता येते. “लाभचक्र” पुन्हा सुरू होते. पण मोदींनी नेमकी इथेच मेख मारून ठेवलीय. सरकारमधल्या बऱ्याच जुन्या व्यवस्थांना धक्का लावला, बऱ्याच व्यवस्था आमूलाग्र बदलल्या, Make in India, आत्मनिर्भर भारताच्या निमित्ताने संरक्षण सामग्रीची, इतर वस्तूंची खरेदी – विक्री, आयात – निर्यातीतली दलाली, मध्यस्थी, deals, वाटा, टक्का, auction सगळे संपवत आणलयं. हे सगळे संपल्यावर आपण करायचे तरी काय?,

“उत्पन्नाचे साधन” आणायचे कोठून? असली भली मोठी प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभे करून ठेवलीयत. पण याचा अर्थ असा नाही, की दलाली, मध्यस्थी, वाटा, टक्का ही व्यवस्था पूर्णपणे संपलीय, तर याचे लाभार्थी काँग्रेस आणि डावे नेते राहिलेले नाहीत. ते आता दुसरे झालेत पण त्यांची सद्दी जुन्या काँग्रेस नेत्यांएवढी असणार नाही, हे मोदींनी ensure केलेय…!!

वैचारिक आत्मघातकी पथकांची ही कहाणी अशी असुफळ आणि असंपूर्ण आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था