अडीच ते तीन मिनिटांच्या भाषणात मोदी spoke volume


सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिला भारतीय ऐक्याचा संदेश


विनायक ढेरे

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचा समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी अडीच ते तीन मिनिटे बोलले. पण बरेच काही ते सांगून गेले. त्यांनी चीनला दिलेला संदेश आधीच्या कडक निषेधाच्या खलित्यांसारखा नव्हता, तर तो ground firm action चा होता. आणि देशांतर्गत विरोधकांना दिलेला संदेशात सध्याचे विरोधक जेव्हा सत्ताधारी होते, त्यावेळच्या inaction चे “वाचन” होते. मोदींचे समारोपाचे remarks खूप कमी वेळात बरेच “सांगून” जाणारे होते.

त्यांनी भारतीय सैन्यदलांना संपूर्ण सूट दिल्याचे सांगताना आधीच्या राजवटीतील सैन्य दलांवरची बंधने अधोरेखित केली. आपले शूर जवान चिनी सैनिकांना त्यांच्या दु:साहसाचा धडा शिकवूनच हुतात्मा झाल्याचे स्पष्ट केले. दररोज “पुराव्यांसाठी” ट्विट करणाऱ्या पण सर्वपक्षीय बैठकीत हजर नसणाऱ्या खानदानी नेत्यासाठी तो संदेश होता. भारताच्या भूमीत कोणीही घुसू शकलेले नाही. एकही इंच भूमीवर कोणी कब्जा करू शकले नाही, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.

पण मोदींच्या भाषणात सर्वांत महत्त्वाचा संदेश होता, “अब तक कोई पुछता नही था, वहाँ अब हमारे जवान डगर डगर पर रोक रहे है। उन्हे टोंक रहे है।” हा होता. आधीच्या सरकारांच्या काळात सीमांकडे झालेले दुर्लक्ष आणि चीनची सतत होणाऱ्या घुसखोरीकडे मोदींचा स्पष्ट अंगुलीनिर्देश होता. आधीच्या सरकारांमध्ये विविध पदे भूषविणाऱ्यांसमोर मोदींनी तो उघडपणे केला. सीमांवर भारताने वेगाने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा, रस्तेबांधणी, हवाई तळ उभारणी, सैन्य दलांची गस्त, क्षमता हे सर्व वाढविल्याचे आणि त्याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे मोदींनी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आवर्जून सांगितले. भारताचा हा धोरणात्मक बदल मोदींनी थोड्या पण नेमक्या शब्दांमध्ये मांडला.

आधीच्या सरकारच्या national advisory council च्या प्रमुख सोनिया गांधी, आपल्या ५० वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत नरसिंह रावांच्या सरकारमध्ये दोन – अडीच वर्षे संरक्षण मंत्रीपद भूषविलेले शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी मोदी सरकारला महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याबद्दल मोदींनी सर्व नेत्यांचे आभार मानून देशाच्या एेक्याचा संदेश जगाला दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था