स्वातंत्र्याच्या बुरख्याआड दहशतवादचा मानवी चेहरा; पाश्चात्य मीडियाचे वास्तव


हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नाईकूच्या खातम्यानंतर पाश्चात्य मीडियाने पांघरलेल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या बुरख्याआडचा दहशतवादी मानवी चेहरा समोर आला. त्यांचा तो “दहशतवादी”; आपला तो “बंडखोर” असे दुटप्पी आणि दांभिक रिपोर्टिंग हेच पाश्चात्य मीडियाचे वैशिष्ट्य बनलेय. आता हा बुरखा पूर्ण फाडण्याची वेळ आली आहे…


संदीप चौधरी, एसएसपी, अनंतनाग (जम्मू काश्मीर पोलिस)

अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्धवस्त करणारा ओसामा बिन लादेन ठार झाला की red x म्हणजे अमेरिकेचा पर्यायाने मानवतेचा सर्वांत मोठा शत्रू ठार झाल्याच्या बातम्या टाइम, न्यूयॉर्क टाइम्स यांनी रंगविल्या होत्या… पण काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नाईकू ठार झाला की गणिताचा माजी शिक्षक आणि बंडखोर भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार झाला… टाइम आणि न्यूयॉर्क टाइम्स सारख्या पाश्चात्य मीडियाची ही reporting style आहे.

भारतात एखादा दहशतवादी ठार झाला की हा पाश्चात्य मीडिया ही गोष्ट अशा पद्धतीने रंगवत असतो की जणू काही अवघ्या मानवतेवर भारतीय लष्कराने हल्ला केला आहे. संबंधिताच्या दहशतवादी कृत्याकडे असे काही दुर्लक्ष करायचे की जो मारला गेला तो फार मोठा सज्जन होता. तो दहशतवादी कसा बनला, त्याचे पूर्वीचे जीवन कसे सर्वसामान्य किंबहुना हलाखीचे गेले. त्याचे आई वडील, बहिण भाऊ कोण आहेत, या गोष्टी अशा रंगवायच्या की वाचकाने त्यात गुंग व्हावे आणि मारला गेलेल्या दहशतवाद्या विषयी वाचकांच्या मनात सहानुभूती आणि कळवळा निर्माण व्हावा.

या सर्व वर्णनात तो दहशतवादी कसा बनला? त्याने दहशतवादी बनण्याचे ट्रेनिंग कुठे घेतले? त्याला कोणी पोसले? त्याने मारला जाण्यापूर्वी किती दहशतवादी कृत्ये केली? त्याने किती लोकांना ठार मारले? या विषयी चकार शब्द हा पाश्चात्य मीडिया काढत नाही. आणि लिहिलेच तर त्यालाही मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना त्यांच्याकडचा दहशतवाद हा दहशतवाद असतो; तर आपल्याकडचा दहशतवाद ही बंडखोरी असते. बंडखोरीच्या नावाखाली आपल्याकडे त्याने हिंसाचार केलेला असतो. पण अमेरिका युरोपात मात्र तो राष्ट्रीय अस्मितेवरचा हल्ला असतो.

रियाज नाईकूच्या खातम्यानंतर हेच घडले. रियाजने केलेली हत्याकांड, त्याने भारतीय लष्कराचे खबरे म्हणून युवकांचे गळे चिरले. त्याचे विडिओ बनविले. याचे वर्णन टाइम किंवा न्यूयॉर्क टाइम्समध्ये तुम्हाला वाचायलाच मिळणार नाही. रियाज नाईकू गणिताचा शिक्षक होता हे मात्र हमखास वाचायला मिळेल. रियाज नाईकूचेच उदाहरण कशाला? प्रभाकरनला जेव्हा भारतीय सैन्याने ठार केले तेव्हा पाश्चात्य मीडियाने दहशतवादी प्रभाकरन ठार झाला असे वर्ण नव्हते केले, तर टायगर प्रभाकरन ठार झाल्याच्या स्टोरीज चालविल्या होत्या.

ओसामा red x होता. तसाच हिटलर, सद्दाम हुसेन, अबू मुसाब अल झरकवी हे देखील red x होते. हे सगळे ठार झाले त्यावेळी न्याय झालेला असतो. भारतात मात्र याच कृत्याविषयी संशय निर्माण केला जातो. कारण red x म्हणजे अमेरिकेचे सर्वाधिक काळ जिवंत राहिलेले सर्वांत मोठे शत्रू…!! भारतात किंबहुना कोणत्याही पूर्वेकडील देशात मात्र दहशतवाद नसतोच; असते ती बंडखोरी…!! यालाच पाश्चात्य मीडिया अविष्कार स्वातंत्र्य म्हणतो.

(द प्रिंटच्या सौजन्याने)

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात