सोशल मीडियावरील गिधाडी धडपड…


Lockdown मळेे मुली घरी सुरक्षित आहेत असं वाटत होतं पण social media मधील रिकामी डोकी विकृतीची हद्द पार करताना दिसतात…


भूवनेश्वरी

काल रात्री instagram उघडलं आणि त्यात एक post बघितली. Boy’s locker room बद्दल. Post वाचल्यावर भीती आणि आश्चर्य ह्या दोन्ही गोष्टी वाटल्या. बराच वेळ त्या मनात घोळत होत्या. पण त्यातही सतत एकच प्रश्न मनाला भेडसावत होता, बलात्कार या शब्दाचा नेमका अर्थ तरी माहितीये का या मुलांना?

साऊथ दिल्लीच्या एका मुलीने instagram group chats चे screenshot share केले होते. त्यात अत्यंत घाणेरड्या पद्धतीने तिच्याबद्दल बोललं गेलं होतं. काही वाक्य वाचून तर अंगावर काटाच आला. खर तर यात आश्चर्य काय? हे तर नेहमीच घडतं, अशा निर्ढावलेल्या प्रतिक्रिया वाचून संताप झाला. पण त्यापुढे जाऊन माझ्या पोटात गोळा तेव्हा आला जेव्हा या मुलांची वय समजली.

१६ – १७ वर्षांची ही मुलं बलात्कार हा शब्द नुसता सहजच वापरत नाहीत तर स्वतःला feminist म्हणून घेणाऱ्या मुलींवर बलात्कार करणं किती योग्य आहे, हे इतर group members ना देखील अत्यंत घाणेरड्या भाषेत पटवून देतात. मुलीला धमक्या देणं, त्रास देणं, तिच्यावर बलात्कार करणं, ही सगळी स्वतःचा male ego rather boy’s ego सुखवण्याची या मानवी गिधाडांची अतिरेकी धडपड चालल्याचे जाणवते. पोलीस, दिल्ली महिला आयोग यांनी या प्रकाराची दखल घेऊन चौकशी देखील सुरू केली आहे. ही सकारात्मक बाब आहे पण मूळ प्रश्न खरंच त्या पलिकडचा आहे.

आज कितीतरी मुली शिक्षणासाठी आपल्या पालकांपासून लांब राहतात. शिक्षण पूर्ण करण्याची आस, पालकांची काळजी आणि आज रात्री आपण सुरक्षित घरी पोहचू ना याची भीती. पूर्वी घरी पोहचल्यावर, आजचा घरी सुरक्षित पोहचण्याचा task complete झालयं असं तरी वाटायचं. पण आता social media वरील काही मानवी राक्षस blackmailing नावाचं हत्यार घेऊन सतत तुमच्याभोवती उभे असतात. आणि हाच भीतीचा साप मुलींना डंख मारून त्यांचा जीव घेत असतो. आज प्रत्येक मुलगी या सापाच्या विळख्यात आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, किती मुली या विळख्यातून बाहेर पडू शकतील आणि किती मुली या विळख्यात गुदमरतील?

खरंतर हे प्रश्न फक्त मुलींनाच नव्हे तर समजतील सगळयांनाच पडले पाहिजेत. या साठी कडक कायद्याचा धाक हवाच पण मूळात पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे. स्त्री ही व्यक्ती नसून फक्त सुख उपभोगण्याचं एक साधन आहे ही मानसिकता बदलली पाहिजे. Lockdown मळेे मुली घरी सुरक्षित आहेत असं वाटत होतं पण social media मधील रिकामी डोकी विकृतीची हद्द पार करताना दिसतात.

‘यदा यदा ही धर्मस्य’ म्हणणाऱ्या श्रीकृष्णाने द्रौपदीचं वस्त्रहरण रोखल्याच्या गोष्टी मुलींना लहानपणापासून सांगितली जाते. पण वस्त्रहरण करूच नये, असं मुलांना कुठं सांगितलं जात? आणि आता तर social medial वर होणारी मुलींची विटंबना पाहून वस्त्रहरणाच्या गोष्टीचा नायकंच बदलासावा वाटत राहतो.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात