लिबरल मीडियाची बौद्धिक खुसपटे


विनय झोडगे

चीनी व्हायरस कोरोनाच्या थैमानाने सगळे जग विशेषत: प्रगत देश हैराण झाले असताना भारतात मात्र तुलनेने चांगली स्थिती आहे. मात्र हे सेक्युलर लिबरल्सना आणि त्यांना वाहून घेतलेल्या मीडियाला सहन होत नाहीए म्हणून आता ते बौद्धिक खुसपटे काढायला लागले आहेत.

भारतात वेळेत आणि टाइट लॉकडाऊन झाले. कोरोनाचा फैलाव रोखण्यात लॉकडाऊनचा फायदाही झाला. केंद्र सरकार उचलत असलेली पावले परिणामकारक ठरत आहेत. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सांगतील ते जनता एेकते आहे. अशा स्थितीत लिबरल मीडियाला मोदींवर थेट तोंडसुख घ्यायला जागाच उरलेली नाही. म्हणून आता मीडियाने लॉकडाऊन, त्याचे टायमिंग, त्याची परिणामकारकता, कोरोना झोनिंग या विषयांवर बौद्धिक वाटतील अशा चमकदार भाषेत प्रश्न उपस्थित करायला सुरवात केली आहे. प्रश्नांचा content नेहमीप्रमाणे सुमार दर्जाचाच आहे, पण भाषेचा फुलोरा मात्र मीडियातील स्वयंघोषित बुद्धिमंतांचा आहे.

मध्यंतरी नाही का ते सावरकरांवर असाच “बौद्धिक” कार्यक्रम चालवून नंतर तोंडावर पडले होते, तेच… हो तेच मिशांचे आकडे काढलेले बौद्धिक पत्रकार आणि त्यांचे क्लोन पत्रकार मोदींच्या विविध निर्णयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची “वट्टात” प्रश्न विचारून मुलाखत घेत होते. गडकरींनी आकडेवारीसह दोन चार जमालगोटे दिल्यावर त्यांना गप्प बसावे लागले आणि नंतर गडकरींच्या खाण्या पिण्यावर प्रश्न विचारावे लागले.

सावरकर मुद्द्यावर आधी बौद्धिक ढोलकी वाजवून नंतर माफीची ढोलकी वाजवणाऱ्याला तर गडकरींकडूनच डबल थप्पड खावी लागली. तर दुसऱ्या अर्ध्या हळकुंडाला सिंगापूरचे लॉकडाऊन आणि भारताचे लॉकडाऊन यांची गैरलागू तुलना केल्याने गडकरींकडूनच बौद्धिक एेकावे लागले. मूळात बुद्धिमान नसताना बौद्धिकतेचा आव आणला की असे होते…!! नुसते गोरेगोमटे दिसून आणि नाक फेंदारत प्रश्न विचारून खरे बुद्घिमान होता येत नाही.

याचा अर्थ असाही नाही, की देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे आलबेल आहे. स्थलांतरित मजूरांचे, अर्थव्यवस्थेचे, सर्व प्रकारच्या उद्योगांचे प्रश्न नक्की गंभीर आहेत. त्यावर सरकारला नक्कीच प्रश्न विचारले पाहिजेत. पण ते प्रश्न genuine आणि solution oriented असावेत. पण असले प्रश्न काढायला आणि विचारायला मूळात अभ्यास असावा लागतो. “वट्टात” तिथेच तर problem आहे. म्हणून मग सरकारला खऱ्या अर्थाने घेरणारे प्रश्न विचारता येत नाहीत आणि सरकार यातून निसटून गेले की मीडिया बहाद्दरांना हात चोळत बसावे लागते.

मोदी सरकार १००% कसोटीवर उतरल्याचा खुद्द सरकारचाही दावा नाही. सरकारचे सगळेच निर्णय चपखल बसले आहेत असेही नाही. पण प्रगत देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नक्की चांगली आहे आणि मोदी सरकारच्या प्रयत्नांची दिशा आणि दशा चांगली आहे. प्रामाणिक आहे. जनता त्यांना सकारात्मक प्रतिसाद देते आहे. यावर या सरकारची सध्या चलती आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात