मुंबई मेरी जान, असंवेदनशील ठाकरे सरकारमुळे झाली बदनाम


मुंबई मेरी जान म्हणणारा देशभरातील श्रमिक ठाकरे सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे येथून पलायन करू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून ढिम्म राहिलेल्या ठाकरे सरकारमुळे लाखो स्थलांतरीत मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सरकारने मारे घोषणा केल्या, पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची विचारपूस करायला एकही शासकीय कर्मचारी आला नाही. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्राबाबतच संताप व्यक्त केला आहे.



निलेश वाबळे


मुंबई मेरी जान म्हणणारा देशभरातील श्रमिक ठाकरे सरकारच्या असंवेदनशिलतेमुळे येथून पलायन करू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून ढिम्म राहिलेल्या ठाकरे सरकारमुळे लाखो स्थलांतरीत मजुरांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. सरकारने मारे घोषणा केल्या, पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची विचारपूस करायला एकही शासकीय कर्मचारी आला नाही. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्राबाबतच संताप व्यक्त केला आहे.


लॉकडाऊन शिथिल होऊ लागला तरीही हे मजूर पायी पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत. कोणी बिहारचे आहे, कोणी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील आहेत. आजपर्यंत मुंबई मेरी जान म्हणालो, पण आता पुन्हा या शहराचे तोंड पाहायचे नाही, असे अनेकांनी सांगायला सुरूवात केली आहे. या मजुरांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर महाराष्ट्राची बदनामी होणार आहे.

एनडीटीव्हीच्याच भाषेत गोदी मीडिया नव्हे तर मोदीविरोधकांचे कैवारी असलेल्या रवीशकुमार यांच्या कार्यक्रमातच महाराष्ट्राबद्दलचा मजुरांचा संताप बाहेर आला आहे. अनेक मजुरांनी आपल्या व्यथा सांगितल्या आहेत. महाराष्ट्रातील सरकारकडून दररोज किती परप्रांतिय मजुरांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली हे सांगितले जात होते. परंतु, एका मजुराने सांगितले की दोन महिन्याच्या काळात आमची एकानेही विचारपूस केली नाही. आम्ही काही खाल्ले आहे का? आमच्याकडे अन्न आहे का? असे कोणी विचारले नाही. 
 
त्यामुळे गावी निघण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी बाहेर पडून पोलीसांना विचारले तर लाठ्यांचे तडाखे मिळाले. दररोज तडाखे खाऊनही घरी जाण्याची आस संपली नाही. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला आणि अर्ज भरून देण्यास सांगितले. परंतु, लालफितशाहीचा कारभार असा की या अर्जातील क्लिष्ठ मराठीच या मजुरांना समजत नव्हती. कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी त्यासाठी मदत करायला तयार नव्हते.

अनेकांनी त्यामुळे पायी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई-आग्रा मार्गावर मजुरांचे जथ्थेच्या जथे निघाले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे टीव्हीवरून कोणाही मजुराने जाऊ नये, त्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन देत होते. परंतु, शासकीय पातळीवरील कोणीही या जथ्याने चालत चाललेल्या मजुरांना आधार दिला नाही. कोणीही उपाशी झोपणार नाही,  असे मुख्यमंत्री म्हणत होते. परंतु, रस्त्याच्या कडेला झाडाखाली पाणी पिऊन मजूर कसाबसा दिवस काढत होते. त्यांना कोणी शब्दानेही विचारले नाही.

यावरून दिसून येते की लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिले. मुळात वांद्रे येथील घटनेने पुढे काय होणार आहे, याचा इशारा दिला होता. या मजुरांचे खाण्याचे प्रचंड हाल होत होते. मुंबईमधील कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा शिवसेनेची तथाकथित सेवाभावी संघटना त्यांच्या मदतीला आली नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा चीनी व्हायरसने मेलेले बरे या मानसिकतेत हे सगळे मजूर आले. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मजूर आपले सामान-कुटुंब घेऊन निघाले. त्यांच्याकडे सामान तरी काय होते;तर एखादी पिशवी आणि खिशात तुटपूंजी रक्कम. त्यांचा धीर पूर्णपणे सुटला होता.  
 
मुंबई रेड झोनमध्ये असल्याने संपूर्ण मुंबईची नाकाबंदी केली आहे. तरीदेखील हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मजुरांना पोलीसांनी अडविले नाही. शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना येऊन समजाविण्याचा प्रयत्न केला नाही. भाड्याचे ट्रक घेऊन चाललेले मजूर जात होते. अनेक जण तर आपल्या रिक्षातून संपूर्ण कुटुंबासह निघाले होते. त्यांना पोलीसांनी अडविले नाही.

मुंबईतून बाहेर पडण्याचे  अनेक मार्ग आहेत, पण नाशिक घाटासारखी ठिकाणे, मुंबई-आग्रा महामार्ग येथे जरी महाराष्ट्र शासनाने आपले अधिकारी नियुक्त केले असते तरीदेखील अनेक मजूर थांबले  असते. केंद्र शासनाने आदेश दिल्यावर पायी निघालेल्या मजुरांसाठी निवाºयाची ठिकाणे उभी केली. मात्र, ती केवळ दाखविण्यापुरती. त्यामध्ये जेवण किंवा इतर सुविधा नव्हत्या.

औरंगाबाद येथील रेल्वे अपघातात सोळा मजुरांचे प्राण गेले. त्यानंतर तरी शासनाला जाग यायला हवी होती. परंतु, नंतरही कायद्याचा किस काढण्यात आला. परंतु, यामध्ये केंद्र सरकारला बदनाम करण्याचे राजकारण होते. केंद्राने लॉकडाऊन केले, त्यामुळेच मजुरांना अडकून पडावे लागले, हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत होता. परंतु, लोकांना आता सत्य समजू लागले आहे.

परंतु, याचा सर्वात मोठा धोका म्हणजे आता देशभरात मुंबईची बदनामी झाली आहे. आपली मातृभूमी सोडून मुंबईला मावशी मानून येणाºयांना ती स्वीकारत नाही, हे आता देशभर पसरले आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या हस्तीदंती मनोऱ्यातून एकदाही बाहेर येऊन पाहिले असते तर कदाचित त्यांना मजुरांचे हाल दिसले  असते. त्यांचे मन संवेदनेने भरून आले असते. परंतु, उध्दव बाहेर पडले नाहीत. शिवसेना सगळी परप्रांतियांच्या द्वेषावर पोसली असल्याने या पक्षाचे इतर कोणा नेत्याला पाझर फुटणे शक्य नव्हते. 
 
सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुंबईत मुळेच नाहीत. त्यांच्या सगळ्या सरंजामदारांना आपापल्या मतदारसंघांची काळजी आहे. त्यामुळे त्यांनीही लक्ष दिले नाही. कॉंग्रेसची संघटना आणि सगळा पक्षच सध्या मृतावस्थेत असल्यासारखा आहे. त्यामुळे या पक्षाकडून काही आशा नाहीच. महाराष्ट्राला आणि मराठीला बदनाम करण्याचे काम या तिघांनी मिळून केले. ये दिल है आसान जिना यहॉ, यह है मुंबई मेरी जान, या गाण्याने मुंबईचे नाव देशात गाजविले. परंतु, या दोन महिन्यांनी आजपर्यंत मुंबईने जे कमावले ते घालवले.   

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात