टीव्हीसमोर उदबत्ती आणि निर्मनुष्य रस्ते : जुन्या मालिकांचा आठव


कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. संपूर्ण भारत घरात बसून आहे. या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘रामायण’ मालिका पुन्हा दाखविण्याची घोषणा केली आहे. यामुळे चाळीशीच्या पुढच्यांच्या भावविश्वातील एक कोपरा हलला आहे. रविवारची सकाळ, स्नान करून अगदी टीव्ही समोर उदबत्ती लावून बसणारे प्रेक्षक आणि निर्मनुष्य रस्ते यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागल्या आहेत.

अभिजित विश्वनाथ

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. संपूर्ण भारत घरात बसून आहे. या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘रामायण’ मालिका पुन्हा दाखविण्याची घोषणा केली आहे. यामुळे चाळीशीच्या पुढच्यांच्या भावविश्वातील एक कोपरा हलला आहे. रविवारची सकाळ, स्नान करून अगदी टीव्ही समोर उदबत्ती लावून बसणारे प्रेक्षक आणि निर्मनुष्य रस्ते यांच्या आठवणी पुन्हा एकदा जागल्या आहेत.
टीव्ही पाहणाºयांच्या पहिल्या पिढीसाठी शनिवारी, रविवारी दाखविले जाणारे चित्रपट, चित्रहार, छायागित, रामायण, महाभारत, शक्तीमान, रजनी, नुक्कड यासारख्या मालिकांचे वेगळे असे भावविश्व आहे. मनोरंजनाची साधने मर्यादित असल्याने संपूर्ण भारताला एका सुत्रात बांधलेल्या या मलिकांनी भारतीयांचे सांस्कृतिक मन समृध्द केले.
भारतामध्ये एशियाड गेम्सच्य निमित्ताने रंगीत टीव्ही आला. रामायण या धार्मिक मालिके पहिला भाग १९८७ मध्ये  निमार्ता-दिग्दर्शक रामानंद सागर यांनी त्यासाठी गुजरातमध्ये एक स्टुडिओ उभा केला होता. अरुण गोविल यांनी राम तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. पण अरविंद त्रिवेदी यांचा रावणही भाव खाऊन गेला. दीपिका चिखलिया आणि अरविंद त्रिवेदी यांनी या लोकप्रियतेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाकडून खासदारकीची निवडणूकही जिंकली.  लक्ष्मणची भूमिका सुनील लहरी यांनी केली होती. दारसिंग हे हनुमान झाले  होते. स्पेशन इफेक्टचे तंत्र विकसित झालेले नसतानाही  हनुमानाचं संजीवनी बुटी आणणं, पुष्पक विमानाचं उड्डाण असे अनेक स्पेशल इफेक्ट् या मालिकेत होते. राम-सेतू उभारण्याचं रामायणातलं दृश्य चेन्नईमध्ये चित्रित करण्यात आलं. गुजरातमध्ये चेन्नईसारखा निळाशार समुद्र नसल्याने या प्रसंगाचं चित्रण चेन्नईमध्ये करावे लागले होते. पण सर्वात लक्षात राहिले म्हणजे त्यातील बाण मारायचे प्रसंग. रामानंद सागर यांनी लहान मुलांवर परिणाम होऊ नये यासाठी बाण मारल्यानंतर रक्त येणार नाही, असे ठरविले होते. कुंभकर्णाचा भाग सुरू झाला त्यावेळी तर लोक अक्षरश: भान हरपून गेले होते. सुमारे दोन वर्षांच्या काळात रामायणाचे 78 भाग पूर्ण झाल्यानंतर आता लव-कुशचीही मालिका करावी असा आग्रह रामानंद सागर यांना होऊ लागला. त्याप्रमाणे त्यांनी उत्तर रामायण या मालिकेची निर्मिती केली होती.
रामायणनंतर १९८८ मध्ये दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरू झाली. या मालिकेत भिष्म पितामहची भूमिका मुकेश खन्ना यांनी केली  होती.  कृष्णाची भूमिका  नितीश भारद्वाज यांनी साकारली  होती.  पंकज धीर यांनी कर्ण तर गजेंद्र चौहान यांनी युधिष्ठिराची भूमिका साकारली होती. प्रसिध्द निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचे पुत्र रवी चोप्रा यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 24 जून 1990 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ‘महाभारत’चे 94  भाग झाले होते. देशात महाभारतावर अनेक ग्रंथ आहेत. त्यामुळे कोणत्या ग्रंथाला प्रमाण मांडायचे असा प्रश्न बी. आर. चोप्रा यांच्यासमोर होता. तमुळे त्यांनी पुण्याच्या  भांडारकर भारतीय प्राचीन इतिहास संशोधन संस्थेतील डॉ. व्ही. एस. सुखटणकर व  एस. के. बेलवलकर यांच्या मदतीने संशोधन करून कथा साकारली.  जगातील सर्व भावभावना महाभारतामध्ये आहेत. त्यामुळे याचा कथाविषय अत्यंत क्लिष्ठ झशला असता. वेगवेगळ्या घटना, प्रसंग यांना एका सुत्रात बांधणे गरजेचे होते. सुरूवातील बी. आर. चोप्रा  यांच्यासमोर सूत्रधार म्हणून दिलीप कुमार किंवा एन.टी. रामाराव यांचा विचार होता. परंतु, संवादलेखक डॉ. राही मासूम रझा यांनी अत्यंत अभिनव कल्पना सुचविली. समय. डॉ. राही मासूम रझा  संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. त्यांनी निर्माण केलेला ‘समय’ पुढच्या दोन वर्षांत प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून गेला. हरीष भिमानी यांचा आवाज अमर झाला. विनोदी कलाकार  गूफी पेंटल यांनी  साकारलेला शकुनी आणि त्याच्या एंट्रीच्या वेळी वाजणारे पार्श्वसंगीतही लोकप्रिय झाले होते.
महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण, कौरवांची मयसभा, कृष्णाचं विराट स्वरूप, शरपंजरी पडलेला भीष्म, दु:शासनवध, चक्रव्यूह, सैन्यरचना, युद्धातील अलौकिक अस्त्रांचे प्रयोग असे अनेक प्रसंग स्पेशल इफेक्ट्सच्या सहाय्याने दाखविले गेले.  जयपूरच्या मैदानात धर्मयुद्धाचं चित्रीकरण झाले.
रामायण, महाभारत यासारख्या पौराणिक मालिकाच नव्हे तर सर्वसामान्यांच्या दररोजच्या जगण्यातील संघर्ष दाखविणाºया ‘हम लोग’ सारख्या मालिकाही प्रचंड लोकप्रिय झाल्या. हिंदीचे प्रसिध्द लेखक मनोहर श्याम जोशी यांनी हम लोग मालिकेची पटकथा लिहिली होती. १९८४ साली प्रदर्शित झालेली ही मालिका लोकांना प्रचंड  आवडली. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनी यातील सूत्रधाराचे काम केले होते. मालिकेच्या शेवटी ते संपूर्ण गोषवार सांगत आणि शेवटचे वाक्य असे ‘मिलते हैै हम लोग’ हम लोगच्या पाठोपाठ १९८६ साली बुनियाद ही मालिका आली होती. हवेलीराम या भूमिकेने  आलोक नाथ यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेचे दिग्दर्शन ‘शोले’ या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी केले होते.  स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका वठवली. या मालिकेत भारताची फाळणी आणि फाळणीनंतर सामान्य माणसाच्या जीवनावर झालेला परिणाम चित्रित केला होता. मजहर खान, निना गुप्तप्ता दिलीप ताहील, गोगा कपूर आणि सोनी राजदान हे या मालिकेमुळे प्रसिध्दीस आले.
‘नुक्कड’ ही अशीच एक सर्वसामान्यांना आपली वाटलेली मालिका. प्रसिध्द दिग्दर्शक  सईद अख्तर मिर्जा आणि  कुंदन शाह यांनी या  मालिकेचे दिग्दर्शन केले होते.  दिलीप धवन, अवतार गिल, पवन मल्होत्रा अशी स्टारकास्ट होती. बडे शहर की एक गली में बसा हुआ है नुक्कड. नुक्कड के सारे वासी है तकदीरों से फक्कड हे शिर्षकगीत अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. मराठी कलाकार अजय वढावकर  यांनी यामध्ये गणपत हवालादाराची भूमिका केली होती. सुरेश भागवत यांनी घन्शु भिकारी साकारला होता. समीर खक्कर या कलाकाराने मद्यपी परंतु सह्रय असलेल्या खोपडीची भूमिका केली होती. त्यांच्यावर या मालिकेमुळे मद्यपीच्या भूमिकेचा आयुष्यभर असा शिक्का बसला की त्यांना दुसºया प्रकारच्या भूमिका मिळाल्याच नाही.
लहान मुले आवर्जून वाट पाहायची मालगुडी डेजची. आर. के. नारायण यांच्या कादंबरवर आधारित या मालिकेत मास्टर मंजूनाथ आणि गिरीश कर्नाड यांच्या भूमिका होत्या. रघुवीर यादव यांना मुंगेरीलाल के हसीन सपने या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवून दिली. १९८९ साली प्रदर्शित झालेली ही मालिकाही मध्यमवर्गीयंच्या भावविश्वावर आधारित होती.
भारती आचरेकर आणि अंजन श्रीवास्तव यांची वागले की दुनिया प्रचंड लोकप्रिय होती. यातील एका भागात आताचा सुपरस्टार शाहरुख खान यानेही काम केले होते.   व्योमकेश बक्षी, पंकज कपूर यांची करमचंद, अशोक सराफ आणि टॉमबॉयच्या रुपातील विद्या बालन यांची हम पॉँच यासारख्या मालिका पाहण्यासाठी लोक सर्व कामे आवरून टीव्हीसमोर बसत.
डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या १९९१ मध्ये आलेया चाणक्य या मालिकेने राष्ट्रवादी भावनेला एका उंचीवर नेले. परदेशी आक्रमकाविरुध्द चंद्रगुप्त मौर्याला तयार करणारा चाणक्य यामध्ये दाखविला होता. हमे देश बनाना हैै हा संवाद आजही आठवणीत आहे. ‘अपने अतीत को पढकर. अपना ईतिहास उलटकर, अपना भवितव्य समझकर, हम करें राष्ट का चिंतन’ हे  या मालिकेचे शिर्षकगीत आजही लोकांच्या लक्षात लहान मुलांसाठी असलेल्या आताच्या मालिकांच्या तोंडात मारील अशी ‘चंद्रकांता’मनात रुतून बसली होती. नीरजा गुलेरी की अजीमोशान पेशकश हैै चंद्रकांता असे म्हणत मालिका सुरू व्हायची.  ‘सागर, सूर्य और चंद्रमा की तरह चंचल चमकती और मदहोश कर देनेवाली मतवाली प्रेमकहानी है चंद्रकांता…हा  अमीन सयानी यांचा व्हॉइस ओव्हर तर लाजबवाब होता. त्याचबरोबर ‘शक्तीमान’ ही भारतीय सुपरमॅनची कथाही प्रचंड लोकप्रिया झाली. १९९७ मध्ये सुरू झालेली ही मालिका सतत आठ वर्षे चालू होती. प्रसिध्द अभिनेते मुकेश खन्ना यांची ही कल्पना आणि त्यांनीच शक्तीमानची भूमिका साकारली होती. फोटोग्राफर पंडीत गंगाधर आणि शक्तीमान हे वास्तविक एकच. स्वत:च्या शक्ती लपवण्यासाठी त्याने ते रुप धारण केलं होते.
रामायण मालिकेच्या निमित्ताने शक्तीमान, महाभारत या मालिका पुन्हा दाखविण्याची मागणी केली जात आहे. फारशी तांत्रिक साधने उपलब्ध नसताना, खर्चाला मर्यादा असताना  निर्माण केलेल्या या मालिकांनी प्रेक्षकांना गुंगवून ठेवले होते. आजच्या पिढीलाही त्या आवडतील यात शंका नाही.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात