Home V of day मोढेराच्या सूर्यमंदिराचा अप्रतिम देखावा; मोदींनी व्हिडिओ केला शेअर गुजरातमधील प्राचीन मोढेरा सूर्य मंदिराचा पावसाळ्यातील अप्रतिम देखाव्याचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील पाटणपासून ३० किलोमीटर अंतरावर मोढेरा येथे १० व्या शतकात सोळंकी वंशाचे महाराज भीमदेव यांनी बांधले. सध्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेले हे मंदिर पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे पर्यटनासह सर्व व्यवसायांना मंदीचे वातावरण सहन करावे लागत आहे. पण लवकरच अपेक्षित असलेल्या अनलॉकच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शेअर केलेला हा व्हिडिओ पर्यटनासाठी एक सकारात्मक संदेश घेऊन येईल, असे मानले जात आहे.