आत्मनिर्भर बिहारच्या वाटेत अडथळे आणणाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्याला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. narendra modi latest news


वृत्तसंस्था

पाटणा : स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्याला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.narendra modi latest news

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या मोदी यांनी रविवारी चार सभा घेतल्या. चारही सभांमध्ये मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. चंपारण्यमध्ये मोदींची अखेरची सभा झाली. यावेळी मोदी यांनी विरोधकांना धडा शिकवण्याचं आवाहन बिहारच्या जनतेला केले.

मोदी म्हणाले की, चंपारण्य ही भारताची आस्था व अध्यात्माची भूमी आहे. ही भूमी आपल्या सामर्थ्याची जाणीव करुन देते. इथे बुद्धांच्या पाऊलखुणा आहेत. येथूनच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची नवी दिशा मिळाली होती. चंपारण्य ही बापूंच्या सत्याग्रहाची भूमी आहे. आज संपूर्ण देशाच्या सहकार्याने आणि सहभागातून अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे.

पण अशा वेळीही तुम्हाला त्या लोकांना विसरायचं नाही, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर उभारण्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले. राम मंदिर उभारणीची वाट आपले आदिवासी बांधव व अनेक पिढ्यांपासून बघत आहेत.

narendra modi latest news

मोदी म्हणाले की, ज्यावेळी जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्यात आलं, त्यावेळी काही नकारात्मक विचाराच्या लोक सांगत होते की, काश्मीरमध्ये आग लागेल. रक्ताचे पाट वाहतील. काय-काय बोलून गेले. पण काय झालं. आज जम्मू काश्मीर आणि लडाख शांततेच्या मागार्नं विकासाच्या दिशेनं जात आहेत.

भाजपाने बिहार शेतकऱ्यांसाठी १ हजार शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने १ लाख कोटींचा निधी तयार केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती