मोदींच्या योजनेचे भुजबळांकडून भरभरून कौतुक! ‘उज्वला’मुळे नाशिक जिल्हा केरोसिनमुक्त; आणि वाटचाल प्रदुषणमुक्तीकडे

विशेष प्रतिनिधी

नाशिक : गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूबाना अनुदानित केरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापि सरकारच्या चूलमुक्त महाराष्ट्र,धूरमुक्त महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत बहुतांश नागरीकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्हा केरोसीनमुक्त झाला असून प्रदुषणमुक्तीच्या दिशेनेही नाशिक जिल्ह्याने एक पाऊल पुढे टाकले आहे, असेच म्हणता येईल.

कोरोसिनचा वापर कमी झाल्याने नागरीकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.शिवाय प्रदुषणही वाढणार नाही, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या योजनेचे कौतुक केले आहे. राज्यातील ज्या कुटूंबाकडे स्वयंपाकाचा गॅस नाही,अशा कुटुंबियांना चुलीसाठी केरोसीनचा पुरवठा बंद करून त्यांना उज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता.

नाशिक जिल्ह्यात १ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार गॅसजोडणी नसल्याचे हमीपत्र सादर करणाऱया शिधापत्रिकाधारकांना अनुदानित केरोसीनचे वितरण करण्यात येत होते. उज्वला उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात गॅस जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाने केलेल्या कामगिरीमुसार जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके तसेच दोन धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रे सप्टेंबर अखेर केरोसीनमुक्त करण्यात आले.

घोषनेनंतर लोकांच्या प्रतिसादात वाढ

जिल्ह्यातील गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकांधरकांना केरोसीनचा पुरवठा केला जात होता. २४ जुलै २०१९ मध्ये राज्य सरकारने चूलमुक्त महाराष्ट्र,धूरमुक्त महाराष्ट्र या योजनेंची घोषणा केली. त्यानुसार ज्या ग्राहकांना अजूनही गॅस जोडणी नाही त्यांना उज्वला मोहिमेंतर्गत गॅस जोडणी देण्याची कार्यवाही करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने जून अखेर येवला,चांदवड,मालेगाव, बागलाण,इगतपुरी,दिडोरी,नांदगाव,नाशिक,निफाड,त्र्यबकेश्वर, सिन्नर,देवळा असे तेरा तालुके केरोसीनमुक्त करण्यात आले होते. डिसेंबर अखेर सुरगाणा व पेठ असे दोन तालुक्यांमध्येही गॅस जोडणी आल्याने जिल्ह्यातील सर्व तालुके हे केरोसीनमुक्त झाले आहे.

मालेगावचा अपवाद

मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने काही भागात मोहिम राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यत त्या ठिकाणी अनुदानित केरोसीनचा पुरवठा करण्यात येत होतो. सप्टैंबर अखेरची आकडेवारी पाहता पंधरा तालुके आणि दोन धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गॅस जोडणी देण्यात आल्याने जिल्हा चूल आणि धूर मुक्तही झाला आहे.

यशस्वी झाल्याचा आनंद वेगळा

याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, केरोसिन पुरवठा ही नेहमीच प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक जबाबदारी राहिली आहे. जास्तीत जास्त लोकांना उज्वला योजनेंमध्ये सहभागी करून घेऊन घरगुती केरोसीनचा वापर शून्यावर आणण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. प्रदुषण मुक्तीच्या दृष्टीने सुध्दा टाकलेले हे एक चांगले पाऊल आहे. कोरोनाशी दोन हात करत असतांनाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे. ही बाब अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*