ठाकरे – पवारांच्या राज्यात ३० हुन अधिक आयपीएस अधिकारी पोस्टिंगच्या प्रतिक्षेत

  • सरकारचे मौन; आयपीएस नियुक्तीचा नवा “ट्रेंड”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वरिष्ठ अधिकारी देवेन बारती यांच्यासह ३६ आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या जबाबदारीची आणि नियुक्तीची प्रतिक्षा आहे. मात्र या बाबत ठकरे – पवार सरकार या वर मौन बाळगून आहे.

गृह खात्याने अलिकडेच आयपीएस मोठ्या अधिकाऱ्यांची इतरत्र बदली केल्याचे ऐकविता नाही. स्मरणात नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर आपले मत नोंदवले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलिकडेच बदलीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण करू, असे सांगितले. पण आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलांना होत असलेल्या विलंबामुळे त्यांनाही आपल्या नव्या जबाबदारीची प्रतिक्षा आहे. या नव्या जबाबदारी,नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच अंतिम मंजुरी देतील.

आमच्या नियुक्तीबद्दल खरेच लवकर निर्णय का होत नाही माहीत नाही, आम्हाला सर्वांना अनेक दिवसांपासून विलंबाने होणाऱ्या नव्या जबाबदारीची प्रतिक्षा आहे. यातील अनेक पदे ही रिक्तच असल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची दहशतवाद विरोधी पक्षाच्या प्रमुखपदी गेल्यावर्षी १६ मे रोजी झाली होती. २ सप्टेंबरला गृह विभागाने नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढला. हे अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकाऱी असून त्यातल बिपीन कुमार सिंग यांची नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि अमितेश कुमार यांची नागपूर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे, मात्र त्यांना नवी जबाबदारी कुठली हे जाणूनबूजून वेगळे दाखवले आहे, पण बराच काळापासून त्यांची नवी नियुक्ती झाली नाही. तसा आदेशही निघालेला नाही.

इतर आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदापासून मुक्त केले आहे, त्यात नवल बजाज (सहआयुक्त, प्रशासन) यांच्याऐवजी राजकुमार व्हटकर, बजाज हे १९९५ च्या बॅचचे आहे. कोविड १९ आणि लॉकडाऊनच्या काळातील त्यांच्या कामांचा विचार करून ही जबाबदारी दिली असावी, बजाज यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून पदोन्नती बाकी आहे. पण त्यांनाही त्याची प्रतिक्षा आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरूडे,पोलिस संचालक कैसर खलिद यांच्यासह २५ हुन अधिक विशेष पोलिस दर्जाचे अधिकारी हे आपल्या नव्या जबाबदारीच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती रखडवण्याचा नवा ट्रेंड तयार होऊ लगाल आहे म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची त्यांच्या जागी नियुक्ती होऊन या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कामांबाबत,जबाबदारीबाबत सहा आठवड्यापासून प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आम्हीही याच प्रतिक्षेत अधिकाऱ्यांची आयपीएस अधिकारी सांगतात.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*