तनिष्क स्टोअरवर जमावाचा हल्ला झालाच नाही; पोलिसांचा खुलासा

  • अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

वृत्तसंस्था

कच्छ : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे तनिष्क ब्रँडच्या स्टोअरवर जमावाने हल्ला केल्याची बातमी फोटोसह मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यावर सोशल मीडियावर टीकाटिप्पणी झाली. परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारचा कोणताही हल्ला झालाच नसल्याचा खुलासा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मयुर पाटील यांनी केला आहे.

तनिष्कने लव्ह जिहादला पाठिंबा देणारी जाहिरात केली होती. ही जाहिरात वादग्रस्त ठरल्यावर ती मागे घेण्यात आली. मोठ्या प्रमाणावर हिंदू समुदायाने या जाहिरातीला विरोध दर्शविला होता.

हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल तनिष कष्ट वरच्या स्टोअरच्या मॅनेजरने माफीनामा लिहिला व तो स्टोअरच्या दरवाजावर चिटकवला होता प्रत्यक्षात अशा माफीनाम्याचे कोणीही मागणी केली नव्हती आता तो माफीनामा दरवाजा वरून हटवण्यात आला आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

मात्र यावरूनच त्यावरूनच काही समाजकंटकांनी संधी घेऊन गांधीधाम मधील तनिष्क स्टोअरवर हल्ला झाल्याची बातमी व फोटो सोशल मीडियावर वायरल केला होता. प्रत्यक्षात असा हल्ला झालेला नाही. त्यामुळे ज्या समाजकंटकांनी सोशल मीडियावर हल्ल्याची अफवा पसरवली त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मयुर पाटील यांनी स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*