“रॉ”मधील कामाचा अनुभव असणारे अधिकारी ठाकरे – पवार सरकारच्या कामाला कंटाळले, सुबोध जयस्वालांच्या केंद्रात जाण्याच्या निर्णयावरून चंद्रकांत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र


वृत्तसंस्था

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाभकास आघाडीने सर्व धोरणांना धाब्यावर बसवून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ही गोष्ट सुबोध जयस्वाल यांना पटली नव्हती.subodh jaiswal news

राज्यातील गेल्या काही महिन्यांतील घटनांमुळे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या भावनांना मोठा धक्का पोहोचला होता. त्यामुळेच जयस्वाल यांनी राज्य सरकारच्या सेवेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. subodh jaiswal news

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. सुबोध कुमार जयस्वाल हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची शक्यताही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविली आहे. जयस्वाल यांच्याकडे ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेतील कामाचा अनुभव होता. त्यांनी 2018 मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. यानंतर त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली होती. subodh jaiswal news

ठाकरे – पवार सरकारने सुबोध जयस्वाल यांच्या शिफारसी नाकारून निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करवून घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुबोध जयस्वाल दुखावले गेले होते. याशिवाय, पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी जयस्वाल यांनी केलेल्या सूचना आणि उपाययोजनाही ठाकरे – पवार सरकारकडून वारंवार धुडकावण्यात आल्या.

subodh jaiswal news

सरकारच्या या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ही गोष्ट राज्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने खूपच घातक आहे. त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था