शिवसेनेला गृहीत धरणे ही भाजपच्या नेत्यांची चूक; त्याचाच राष्ट्रवादीला फायदा


  • शिवसेनेचे सहकार्य नसते तर भाजपाला महाराष्ट्रात १०५ ऐवजी ४०-५० जागाच मिळाल्या असत्या; शरद पवारांचा दावा
  • भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला आणि काँग्रेसच्या सहकार्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या असत्या?, यावर पवारांचे “मौन”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाला साथ दिली नसती तर भाजपाला राज्यात केवळ ४० ते ५० जागा मिळवता आल्या असत्या असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र भाजपच्या सहकार्याशिवाय शिवसेनेला आणि काँग्रेसच्या सहकार्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या असत्या यावर त्यांनी “मौन” बाळगले. कारण “बेतलेल्या” मुलाखतीतून हा प्रश्न वगळण्यात आला होता.

भाजपाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या १०५ जागांवर विजय मिळवला आहे त्यामध्ये शिवसेनेचे फार मोठे योगदान असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलखतीत ते बोलत होते. पवार म्हणाले, “भाजपाने मित्र पक्षाला गृहित धरण्याची भूमिका अयोग्य होते.

“लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करू शकला नाही. यासंदर्भात तुमचे काय मत आहे,” या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली हे पाहणं महत्वाचे आहे. मुळात प्रमुख पक्ष प्रमुख कसा झाला याच्या खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, १०५ हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचे योगदान फार मोठे होते.

त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केले तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपाचे काही नेते आम्ही १०५ असे सांगतात. मात्र त्यांना १०५ वर पोहचवण्याचे काम ज्यांनी केले त्यांनाच गृहित धरण्याची भूमिका भाजपने घेतली तर मला नाही वाटत की मी वेगळं काही करण्याची गरज होती.”

लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरून पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्यांवरील प्रश्नावर पवारांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला. “लॉकडाउनमुळे आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही. बरीचशी काम करता येत नाहीत.

अनेक अ‍ॅक्टीव्हीटी थांबल्याचा परिणाम वेगवेगळ्या घटकांवर झाला. तसा तो वृत्तपत्रांवरही झाला. त्यांना बातम्या देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागा भरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मी मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही,” असा दावा पवारांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था