समित ठक्कर प्रकरणात ठाकरे – पवार सरकारची दंडुकेशाहीच, मग महाराष्ट्रात आणीबाणीच जाहीर करा ना!!,


  • चंद्रकांतदादा पाटील यांचे संतप्त उद्गार पंतप्रधान, राज्यपालांविरोधात काहीही बोलले तर त्यांना चालते, त्यांचे अविष्कार स्वातंत्र्य विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार समित ठक्कर(samit thakkar news) प्रकरणात दंडुकेशाही करणार आणि राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांच्याबद्दल काहीही म्हणालात, तरी तुम्हाला काहीच कोणी म्हणायचे नाही. एकदाची महाराष्ट्रात जाहीर करून टाका ना, आणीबाणी, असे संतप्त उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. आता लोक थांबले आहेत फक्त की कधी निवडणूक होते आणि हे सरकार जाते याची वाट पाहात,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती विविध मुद्द्यांवर टीका केली. ते म्हणाले, बहुजन कल्याण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. महाविकास आघाडीच मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत आहे. विजय वडेट्टीवार कोण आहेत? हे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. रोज येऊन एक एक वक्तव्य करतात. मुद्दाम जातीयवाद पसरवण्याचे काम हे लोक करतात.samit thakkar news

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या. निवडणुकीची पुरती तयारी झाली नाही. १७ दिवसांत तयारी कशी करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे, असे सांगून पाटील म्हणाले, कंजूरमार्गच्या केंद्राच्या जागेवर राज्य सरकारने अतिक्रमण करण्याचा प्रश्नच नाही. ती जागा अधिकृतपणे केंद्राची आहे.samit thakkar news

ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निर्माण करण्याचे काम राजकीय पक्ष करत आहेत, असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यावर पाटील म्हणाले, मूळात असा वाद लावण्याचे काम राज्य सरकारमधील मंत्रीच करत आहेत. आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र ठेवले, न्यायालयात टिकवून दाखविले. मात्र, फूट पडून राज्य करण्याचे काम महाविकास आघाडीतील तथाकथित मित्र पक्ष करीत आहेत.samit thakkar news

samit thakkar news

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच आहे का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत, असे सांगून पाटील यांनी समित ठक्कर प्रकरणात ठाकरे – पवार राज्य सरकार दंडुकेशाही करत आहे. समित ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली आहे. त्याला आधी नागपूर पोलिसांनी आणि नंतर मुंबई पोलिसांनी अटक करून पोलिस कोठडीत ठेवले आहे.samit thakkar news

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था