बलात्कार आणि खुनांमध्ये ठकरे – पवारांचे राज्य देशात “नंबर वन”

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील १९ वर्षाआतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात २०१९ मध्ये २८६ महिलांवर बलात्कार आणि त्यांचे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या. जवळपास २८३ घटना या दोन्ही वर्गवारीनुसार दाखविल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात ४७ घटना या बलात्कार,सामुहिक बलात्कार करून खून केल्याच्या असून महाराष्ट्र अव्वल आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने (एनसीआरबी) देशातील गुन्हेगारीचा २०१९ चा अहवाल प्रकशित केला असून, त्यानुसार देशात ३२ हजार ३३ बलात्काराच्या घटना घडल्या आहे. दरदिवशी ८८ महिलांवर बलात्कार होत असल्याचे यातून उघड झाले आहे. गुन्हेगारीत राजधानी द‌िल्ली सर्वांत असुरक्षित शहर असल्याचे पुन्हा स‌िद्ध झाले आहे. देशाची आर्थ‌िक राजधानी असलेल्या मुंबईचा १९ प्रमुख शहरांच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक लागला आहे. राज्यांमधील गुन्हेगारीत देशात उत्तर प्रदेश अव्वल स्थानी आहे

देशात महिला अत्याचाराच्या घटनेत 7.3 टक्क्यांनी वाढ

देशात मागील वर्षी (2019) महिलांवरील अत्याचाराचे एकूण चार लाख पाच हजार गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद आहे. तर 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महिला अत्याचाराच्या प्रमाणात तब्बल 7.3 टक्क्यांनी वाढ झाली. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर एक लाख महिलांमागे 117 महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.

देशात सर्वाधिक गुन्हे हे भारतीय दंड संहितेअंतर्गत नोंदवले गेले. 30 टक्के गुन्ह्यांत महिलांवर घरच्या नातेवाईकांनीच लैंगिक अत्याचार केले. तर 21.8 टक्के गुन्ह्यांत महिलांवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. 17.9 गुन्ह्यांत महिलांचे अपहरण करण्यात आले. तर 7.9 टक्के महिलांवर बलात्कार झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी सांगते.

बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान सर्वात पुढे,सुशिक्षित केरळ दुसऱ्या स्थानावर

राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या ताज्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थामध्ये एकूण 5997 बलात्काराचे गुन्हे घडले असून हे प्रमाण 15.9 टक्के आहे. तर 100 टक्के सुसिक्षित म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये प्रति 1 लाख महिलांमागे 11 महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. महिला सामाजिक तिरस्कार, प्रतिष्ठेच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे महिला अत्याचारांचा हा आकडा यापेक्षाही मोठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सायबर गुन्ह्यात ६३ टकक्यांनी वाढ

एकूण आकडेवारीत २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये महिला अत्याचाराच्या घटनेत ७.३ टक्के; तर सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १९ शहरांचे सर्वेक्षण या अहवालात करण्यात आले आहे. भादंव‌िअंतर्गत विविध कलमांमध्ये सर्वाधिक दोन लाख ९४ ६५३ गुन्हे दिल्लीत घडले असून, मुंबईत २०१९ मध्ये ४० हजार ६८४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ३३ हजार १८० प्रकरणांसह जयपूर हे शहर देशामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. हत्येच्या सर्वाधिक ५०५ घटनांसह राजधानी पहिल्या क्रमांकावर असून बेंगळुरूमध्ये २०४; तर हत्येच्या १६८ घटनांसह मुंबई

महाराष्ट्राकडे दुर्लक्ष नकोच

लोकसंख्येच्या तुलनेत पाहिले तर गुन्हेगारीचे प्रमाण मुंबईत ७६.५ टक्के आहे. टक्केवारीत मुंबई नवव्या स्थानावर आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीमध्ये १२३१, जयपूरमध्ये ५१७; तर मुंबईत बलात्काराच्या ३९४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी २०६९ गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये अपहरणाच्या ५०३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे; तर दिल्लीमध्ये १३ हजार ६६१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये हरवलेल्या अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीमध्ये चोरीचे दोन लाख ४२ हजार ६४२, जयपूरमध्ये ११ हजार ९८५ तर मुंबईत आठ हजार ५८२ गुन्हे २०१९ मध्ये घडले आहेत. वाहनचोरीचे दिल्लीत ४५ हजार ८४१, जयपूर ८३५९ तर मुंबईत २६९१ गुन्हे दाखल आहेत.

सर्वाधिक गुन्हे

उत्तर प्रदेश  –  ३,५३,१३१

महाराष्ट्र –  ३,४१,०८४

राजस्थान –  २,४६,४७०

महिलांवर अत्याचार

दिल्ली – १२९०२

मुंबई – ६,५१९

बलात्काराच्या सर्वाधिक घटना

राजस्थान , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*