सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले-खा.रक्षा खडसे


विशेष प्रतिनिधी

जळगाव (यावल) :  पक्षाने मला दोन वेळा भाजपच्या कमळ जिन्हावर खासदार बनवले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले आहे. त्यामुळे मी भाजपातच राहणार आहे. भाजपचा विस्तार हा अधिक जोमाने करा,त्यासाठी वेळप्रसंगी नवीन कार्यकर्तेसुध्दा जोडावे लागणार आहे. ते आपण जोडू,असे खासदार रक्षा खडसे यांनी येथे आज बैठकीत स्पष्ट केले.

(raksha khadse lok sabha)

भाजपची महत्वपूर्ण बैठक धनश्री चित्रमंदीराच्या हॉलमध्ये घेण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात सांगितले की,भाजपची संघटना मजबूत आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने व एकदिलाने काम करावे, डॉ.राजेंद्र फडके म्हणाले की, जनसंघापासून भाजपचे काम चालु आहे, स्व.नाना पील,डॉ.अशोक फडके,चोपड्याचे आमदार माधवराव पाटील असे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,मदार,खासदार अशा विपरित परिस्थितीमध्ये निवडून आलेले आहेत.

raksha khadse lok sabha

लहान कार्यकर्ता देखील मोठा होऊ शकतो-पुराणीक

संघटनमंत्री विजय पुराणीक यांनी समारोप केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षात लहान कार्यकर्ता आमदार,खासदार मंत्री व मोठा नेता होऊ शकतो. हे भारतीय जनता पक्षातच शक्य आहे. काही घटना घडल्यास पक्ष कार्यकर्त्यांनी खचून न जाता त्यात कार्यकर्त्यांमधून नेता तयार होता. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार भोळे तसेच खासदार रक्षा खडसे, संघटनमंत्री पुराणिक, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर,माजी सरचिटणीस विजय धांडे आदी उपस्थित होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती