मातोश्रीतून आश्वासन मिळूनही कर्जमाफी नाहीच, पनवेलचा शेतकरी १० महिन्यांनी पुन्हा मातोश्रीच्या दारात


  • पोलिसांनी अडवून घेतले ताब्यात, उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मातोश्रीतून १० महिन्यांपूर्वी कर्ज प्रकरण तडीस लावण्याचे आश्वासन मिळाले होते. पण ते तडीस गेले नाही म्हणून कर्जाला वैतागलेला शेतकरी न्याय मागण्यासाठी त्याच्या कुटुंबासह पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या मातोश्री या निवासस्थानी गेला, पण पोलिसांनी त्याला बाहेरच अडवून ताब्यात घेतले. महेंद्र देशमुख असं शेतकऱ्याचं नाव आहे.matoshree bungalow

देशमुख यांनी जानेवारी महिन्यात असाच प्रयत्न केला होता. तुझा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असं आश्वासन या शेतकऱ्याला त्यावेळी मातोश्रीतून खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्यांच्या कर्जाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही म्हणून हा शेतकरी आज पुन्हा एकदा आपल्या पत्नीसह मातोश्री या ठिकाणी आला. त्याने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महेंद्र देशमुख हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आहेत. बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या महेंद्र देशमुख यांनी मातोश्रीबाहेर आज उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

बँकेच्या कर्जामुळे वैतागलेले शेतकरी महेंद्र देशमुख हे त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीसह मातोश्रीवर आले होते. जानेवारी महिन्यात जेव्हा ते आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महेंद्र देशमुख तुम्हाला न्याय मिळेल असं म्हटलं होतं. मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही असं सांगत आज महेंद्र देशमुख त्यांच्या पत्नी आणि मुलीसह मातोश्रीवर आले. त्यांनी उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की महेंद्र देशमुख यांचं प्रकरण तडीस न्यापण आजपर्यंत कोणीही न्याय दिला नाही. जून महिन्यापासून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र कोणीही भेट होऊ दिली नाही असाही आरोप महेंद्र देशमुख यांनी केला.

matoshree bungalow

काय आहे प्रकरण?

पनवेल तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने फसवणूक केल्याचा आरोप महेंद्र देशमुख यांनी केला आहे. शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीमार्फत आठ दिवसात चौकशी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी ६ जानेवारीला रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मातोश्रीवर आंदोलन केल्यापासून महेंद्र देशमुख चर्चेत आले होते. महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वखर्चासाठी २४ फेब्रुवारी २००६ रोजी ८ लाख ४० हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली होती. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.

१५ मार्च २००८ रोजी महेंद्र देशमुख यांनी १० लाख २० हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी २००६ आणि २००७ या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे २३ ते २४ लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास ८ लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे ३२ लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही ४० लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी ८ लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले.

या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास ३२ लाख रुपये परत मिळू नयेतयासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखी पत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती