राहुलच्या जवळच्या नेत्याकडूनच झाली दंगलीच्या कारस्थानाची पोलखोल

  • “आम्ही पूर्ण तयारी केलीय दंगे कोणीच रोखू शकणार नाहीत”; श्योराज वाल्मिकीचे वक्तव्य
  • हाथरस घटनेनंतरचा व्हिडीयो व्हायरल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “हाथरसमधील दंगे तर कोणीच रोखू शकत नाही. आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे” असे भडकऊ वक्तव्य करणाऱ्या कॉग्रेस नेते आणि पूर्व केंद्रीय राज्यमंत्री श्योराज जीवन वाल्मिकी यांच व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून या दंगलीस कॉग्रेसची फूस असल्याचे उघड झाले आहे. श्योराज हा कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचा मानला जातो.

अर्नब गोस्वामी यांच्या रिपब्लिक मिडीया नेटवर्कने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे जबरदस्त खुलासा केला. हाथरसमधील घटनेनंतर पूर्ण उत्तर प्रदेशात दंगे घडविण्याचा कट उघड झाला आहे. रिपब्लिकनच्या या स्टींगमध्ये कॉग्रेस नेत श्योराज जीवन वाल्मिकी हे दंगे कशा पध्दतीने करायचे याबाबत कार्यकर्त्यांना माहिती देताना दिसत आहे. या खळबळजनक घटनेने हाथरस प्रकरण एका वेगळ्या वळणावर आले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये श्योराज जीवन वाल्मिकी सांगतो की, दंगे तर होणारच ते कोणीच रोखू शकत नाही. यासाठीची सर्व तयारी केलेली आहे. वाल्मिकी समाजाचे मार्शल सर्व परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहेत. आम्ही लोकांना गावात जाऊन मारझोड करू शकतो. अनेकांना मारून टाकून देऊ शकतो, शहरात आमची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्याचा पुरेपुर वापर आम्ही करू. यासाठी आम्ही साम दाम दंडाचा उपयोग करू शकतो.

रिपब्लिकच्या खुलाशा नुसार श्योराज म्हणतो हाथरसमध्ये जातीचे राजकारण करून वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न होत असून पिडीत परिवारावर दबाव वाढत चालला आहे या वाहिनीच्या प्रसिध्दीनुसार हा व्हायरल व्हिडीय़ो हा दंग भडकविण्यास कॉग्रेसच कारणीभूत असून श्योराज यांचे हे वक्तव्य म्हणजे ठोस पुरावाच आहे. या व्हिडीओतून दाखवले आहे की हि केस बंद होणार नाही या घटनेपासून पीडित परिवार सुध्दा हताश झालेला दिसत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*