परमबीर सिंह यांच्या तथाकथित पराक्रमाची हसन गफूर यांच्याकडून पोलखोल

  • २६-११ च्या मुंबई हल्ल्याचा मुकाबला परमबीर सिंह यांनी मैदानात उतरून केलाच नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे सध्याचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांच्या तथाकथित पराक्रमाची मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पुरती पोलखोल केली आहे. २६-११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी परमबीर सिंह हे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त होते. हल्ला झाला त्यावेळी प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यांनी दहशतवाद्यांशी मुकाबला करायला नकार दिला होता, असे हसन गफूर यांनी म्हटले आहे.

२०१० मध्ये हसन गफूर यांच्या विरोधात परबीर सिंह यांचे वडील होशियार सिंह यांनी हसन गफूर यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टांने तिला स्थगिती दिली आहे. २६-११ ची चौकशी करणाऱ्या प्रधान समितीसमोरही परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव केला होता. त्यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. परमबीर सिंह यांनी त्यावेळी हसन गफूर यांना मानहानीची केस करण्याचा इशाराही दिला होता.

उलट परमबीर सिंह आणि अन्य चार अधिकारी कर्तव्यात कसूर करत होते म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी याचिकाही दाखल करण्यात आली होती. परमबीर सिंह यांना सुपरकॉप ज्युलिओ रिबेरो यांनी एका लेखात बॅडकॉप म्हटले होते. परमबीर सिंह यांनी हिंदू दहशतवादाच्या मुद्यावरून खासदार साध्वी प्रज्ञा यांना छळल्याचाही आरोप आहे. २०१९ च्या डिसेंबरमध्ये परमबीर सिंह यांनी लाचलुचपत विभागाचे आयुक्त असताना अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लिन चिट दिली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*